Nashik: आणखी एक वैष्णवी! सासरच्यांकडून मानसिक अन् शारीरिक छळ; शेवटी विवाहितेने घरातच गळफास घेत..

Married Woman killed herself: नाशिकच्या गंगापूर परिसरात एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने घरातच गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे.
Nashik
NashikSaam
Published On

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील संतापाची आग अजूनही लोकांच्या मनात धगधगत असताना नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकच्या गंगापूर परिसरात एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून तिने घरातच गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात पती आणि इतर सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धक्कादायक घटना नाशिकच्या गंगापूर रोडवरील उच्चभ्रू वसाहतीत घडली. भक्ती अथर्व गुजराथी (वय ३७) असे मृत महिलेचं नाव आहे. भक्ती आणि अथर्व यांचा ७ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक ५ वर्षांचा मुलगा देखील आहे. मात्र, विवाहानंतर भक्तीवर सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या वडिलांनी केला.

Nashik
Political Leader: हायवेवर कार थांबली, निर्वस्त्र महिला बाहेर आली; नेत्यासोबत शरीरसंबंध ठेवताना सीसीटीव्हीत रेकॉर्ड

भक्तीला त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला माहेरी आणले होते. पण, अथर्वने तिला पुन्हा सासरी नेले. मात्र, सासरच्या मंडळींकडून त्रास सुरूच राहिला. अखेर भक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनंतर भक्तीच्या आई वडिलांनी गुजराथी कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी अथर्व गुजराथी आणि त्याच्या कुटुंबावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Nashik
Solapur: 'मीच गळा दाबून तिला पुरलं'; पोटच्या लेकीला वडिलांनी संपवलं, रात्री मायेनं जवळ गेली अन् नराधमाने..

भक्तीच्या शरीरावर जखमांचे अनेक खुणा आढळल्यामुळे ही आत्महत्या की हत्या, याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. तसेच तिच्या लहान मुलाच्या ताब्याबाबतही त्यांनी दावा केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com