

हरयाणात घडली धक्कादायक घटना
बापाने इमारतीवरून मुलीला फेकले
मुलीला फेकल्यानंतर स्वत:ही मारली इमारतीवरून उडी
हरियाणाच्या गुरूग्राम शहरातून हादरवणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या ३ वर्षीय मुलीला इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून खाली फेकलं. मुलीला फेकल्यानंतर स्वत:ही इमारतीवरून उडी मारली. या दोन्ही बापलेकीचा इमारतीवरून पडल्यानंतर जागीच मृत्यू झाला आहे.
हरियाणाच्या गुरुग्राममधील सेक्टर १०२ येथील जॉयविले सोसायटीत ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात पाठवले आहेत. दोघांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं जाणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गुरुग्राममधील व्यक्तीच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे सोसायटीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या पथकाने सोसायटीतील लोकांची चौकशी सुरू केली आहे. तसेच सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
व्यक्तीच्या आत्महत्येनंतर सोसायटीमधील लोकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना या व्यक्तीच्या घरात मृत्यूपूर्वी लिहिलेली शेवटची चिठ्ठी सापडलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीवरून उडी मारणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. राहुल असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा दिल्लीच्या नांगलोई येथील रहिवासी आहे. तो गुरुग्रामच्या जॉयविले सोसायटीत पत्नी आणि मुलीसोबत राहत होता. राहुल हा सोमवारी अचानक मुलीला घेऊन इमारतीच्या २३ व्या मजल्यावर पोहोचला. त्यानंतर अचानक मुलीला इमारतीवरून फेकले. त्यानंतर स्वत:ही उडी मारली. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.