Datta Gade Abusing Case Full History  Saam Tv News
महाराष्ट्र

Datta Gade : आरोपी दत्ता गाडेबाबत धक्कादायक माहिती समोर, फक्त महिलांना करायचा लक्ष्य; आत्तापर्यंतची History...

Pune Datta Gade Total History : गाडेचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकृत असून, त्याने यापूर्वीही महिलांबाबत गुन्हे केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील स्वारगेट डेपोत उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणारा नराधम दत्तात्रय गाडे हा प्रवास करणाऱ्या एकट्या महिलांना सावज बनवून लुटमार करायचा, असं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६) याच्याविरोधात शिरूर आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन आणि अहिल्यानगरमधील सुपा आणि कोतवाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे गाडेचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकृत असून, त्याने यापूर्वीही महिलांबाबत गुन्हे केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

दत्तात्रय गाडेविरोधात दाखल सहाही गुन्ह्यांमध्ये तो एकट्या महिलांना फसवून लूटमार करत असल्याचं निदर्शनास येत आहे. बसची वाट पाहणाऱ्या महिलांना चारचाकीत बसवून तो मोकळ्या ठिकाणी नेऊन लुटायचा, असंही त्याच्याविरोधात दाखल तक्रारीत नमूद आहे. २०१९मध्ये सुपा पोलीस ठाणे (अहिल्यानगर), कोतवाली पोलीस ठाणे (अहिल्यानगर), शिरूर पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण) या पोलीस स्टेशनमध्ये गाडेवर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय २०२० मध्ये देखील शिरूर आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

१. नगरहून पुण्याकडे जाण्यासाठी तक्रारदार महिला बसची प्रतीक्षा करीत होती. त्या वेळी गाडे चारचाकी घेऊन तिथे आला. मी देखील पुण्याला चाललो आहे, तुम्हाला सोडतो, असं त्याने महिलेला सांगितलं. त्यानंतर चारचाकी निर्जनस्थळी नेऊन त्याने पीडितेचा गळा दाबून तिच्याकडील दागिने हिसकावले होते.

२. नगर बसस्थानकात पुण्याकडे जाणाऱ्या एसटीची वाट पाहणाऱ्या महिलेजवळ येऊन आरोपी गाडेने पुणे, पुणे असा आवाज दिला. त्यावर महिलेने सहप्रवासी घेणार का? अशी विचारणा केली. त्यावर गाडेने होकार दिल्याने त्या गाडीत बसल्या. त्यानंतर गाडेने काही अंतरावर एका मोकळ्या ठिकाणी चारचाकी थांबवून महिलेला लुटलं होतं.

३. नीरा येथे जाण्यासाठी न्हावरा फाटा येथे थांबलेल्या महिलेजवळ आरोपी गाडे चारचाकीतून आला. त्याने महिलेला चौफुला येथे सोडण्याचं आश्वासन देऊन चारचाकीत बसवलं. त्यानंतर काही अंतरावर चाक पंक्चर झाल्याचा बहाणा करून, वाहन थांबवून महिलेला धमकावून तिचे दागिने लुटले होते. याशिवाय भाजीविक्रेत्या महिलेच्या दुकानासमोर गाडी थांबवून त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. संतापून महिलेने आरोपीच्या गाडीवर दगड मारल्यावर गाडेने तेथून पळ काढला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाकडून उद्या ऑरेंज अलर्ट जारी

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT