Datta Gade : दत्तात्रय रोज रात्री पुण्यात सावज शोधायचा, मुसक्या आवळल्यानंतर कारमध्ये दत्ता पोपटासारखा बोलला...

Pune Crime News : दिवसभर गावामध्ये थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टँडवर महिला सावज हेरायचा अशी कबुली गाडे याने दिली आहे.
Pune Datta Gade Court Hearing
Pune Datta Gade Court HearingSaam Tv News
Published On

पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील स्वारगेट बस डेपोत एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करून फरार झाला आहे. तब्बल ७० तासांनंतर नराधम आरोपीला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. मंगळवारी पहाटे फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आलेल्या असताना त्या तरूणीवर दत्तात्रय गाडे या आरोपीने एका शिवशाही बसमध्ये अत्याचार केला होता.

आज शुक्रवारी रात्री एक ते दिड वाजण्याच्या सुमारास आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील त्याच्या मुळगावी गुनाट येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला पुण्याकडे आणताना पोलिसांनी दम देताच गाडे कारमध्येच तो पोपटासारखा बोलू लागला. आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यालाा गाडीमध्ये बसवलं आणि पुण्याला आणण्यात आलं. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गाडीतच आरोपी दत्ता गाडेची चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

Pune Datta Gade Court Hearing
Vicky Patil Murder : रिलस्टार विक्की अन् वडिलांची हत्या, घटनेला वेगळं वळण लागणार? चाहत्यांचे स्टेट्स सांगतात...

स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एसटी डेपोत जाऊन सावज शोधायचा अशी माहिती समोर आली. मोबाईलच्या गेल्या दोन महिन्याच्या तांत्रिक विश्लेषणातून माहिती समोर आली आहे. दिवसभर गावामध्ये थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टँडवर महिला सावज हेरायचा अशी कबुली गाडे याने दिली आहे. यापूर्वी ही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होतं.

दत्ता गाडेने याआधी देखील काही महिलांसोबत अशाच पद्धतीने अत्याचार केला केला असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. काही महिलांसोबत गोड बोलून मोबाईल नंबर घेऊन जवळीक निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

Pune Datta Gade Court Hearing
Devendra Fadanvis : दत्ता गाडेचा बदलापूरचा अक्षय शिंदे होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com