Pratiksha Patil : 'मस्त जगा, कोणता दिवस शेवटचा असेल...' जळगावच्या प्रतीक्षा पाटीलची मृत्यूपूर्वी मन हेलावणारी पोस्ट

Chalisgaon Pratiksha Patil Cancer Death : २८ वर्षीय प्रतीक्षा पाटील या महिलेचा कॅन्सरने मृत्यू झाला. प्रतीक्षा MA'ed झाल्या होत्या. त्या जळगावातील एका प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करत होत्या.
Chalisgaon Primary School Principal Pratiksha Patil
Chalisgaon Primary School Principal Pratiksha Patil Saam Tv News
Published On

जळगाव : जळगावमधील चाळीसगाव तालुक्यात एका विवाहितेचा २७ फेब्रुवारी रोजी कर्करोगाने मृत्यू झाला. महिलेवर मागील जवळपास वर्षभरापासून उपचार सुरू होते. पण अखेर तिची प्राणज्योत मालवली. पण महिलेनं तिच्या मृत्यूआधी खास महिलांना उद्देशून एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली होती. आजकाल कोणाचा, कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही, त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा.... पोस्ट लिहित महिलेनं तिच्यासोबत काय घडलं ही संपूर्ण घटना शेअर केली आहे. मृत्यूपूर्वी तिने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत असून या भावनिक पोस्टने सर्वच नि:शब्द झाले आहेत.

२८ वर्षीय प्रतीक्षा पाटील या महिलेचा कॅन्सरने मृत्यू झाला. प्रतीक्षा MA'ed झाल्या होत्या. त्या जळगावातील एका प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करत होत्या. वयाच्या २४व्या वर्षी त्यांचं यावल येथील क्लास वन अधिकारी, वनविभागातील वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी लग्न झालं होतं. दोघांचा सुखी संसार सुरु होता. मात्र, काळाला काही वेगळच मान्य होतं. काही दिवसांपूर्वी प्रतीक्षा पाटील यांचा कॅन्सरने मृत्यू झाला.

Chalisgaon Primary School Principal Pratiksha Patil
Sanjay Kadam : एकनाथ शिंदेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंना मोठा हादरा, कोकणातील मातब्बर नेता शिवसेनेत जाणार

नेमकं काय घडलं?

महिलेनं तिच्यासोबतचा संपूर्ण प्रसंग लिहित इतर महिलांना आनंदाने जगून घ्या, असा संदेश दिला आहे. पोस्टमध्ये लिहिलंय की, त्यांच्या जीभेवर सुरुवातीच्या काळात छाले आले होते. त्यावर त्यांनी उपचारही घेतले. तीन महिने झाले उपचार सुरू होते. पण नंतर जीभेला गाठ झाली. तपासात ही गाठ कॅन्सरची असल्याचं समोर आलं.

८ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. चार महिने केमोथेरपी, रेडिएशन अशा गोष्टी चार महिने सुरू होत्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सरमुळे प्रतीक्षा यांची जीभ कापण्यात आली. त्यामुळे यापुढे त्यांना कधीही बोलता येणार नव्हतं. या संपूर्ण उपचारादरम्यान त्यांचं १० किलो वजन कमी झालं. मी यातून वाचले हेच घरच्यांसाठी महत्त्वाचं होतं, असं काळीज पिळवटून टाकणारे शब्द महिलेनं लिहिले आहेत.

आपण ही पोस्ट का लिहितो आहेत, याचं उद्दिष्टही महिलेनं सांगितलं. त्यांनी लिहिलं की, आज माझ्याकडे काय नाहीये... गाडी, बंगला, सोनं, नवरा क्लास वन अधिकारी... सगळं आहे, पण मी नसली तर याचा उपयोग काय... आपण स्वत:कडे दुर्लक्ष करतो. मृत्यूच्या दारातून परत येतो, त्याला जीवनाची किंमत कळते. त्यामुळे सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, जीवन जगा, कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही. तसंच सगळ्यात महत्त्वाचं आपण काय खातोय, याकडेही लक्ष द्या, अशी पोस्ट महिलेनं तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी केली होती. महिलेवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर केवळ २० दिवसातच तिचा मृत्यू झाला. या घटनेनं महिलेची व्हायरल पोस्ट वाचून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com