Satish Bhosale : बीडमध्ये गरीब व्यक्तीला निर्वस्त्र करुन बेदम मारहाण, बीडमध्ये गावगुंडांची दहशत; सतीश भोसले नक्की कोण?

Beed Satish Bhosale Video : धक्कादायक बाब म्हणजे, हा सतीश भोसले या आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येत आहे.
Satish Bhosale Video
Satish Bhosale VideoSaam TV News
Published On

बीड : बीडमध्ये एका कुख्यात गुंडाचा अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. गुंड सतीश भोसले हा एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारी आणि गुंडप्रवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे.

आठ दिवसांपुर्वी बाबी ता. शिरूर येथील ढाकणे नावाच्या व्यक्तीला या सतीश भोसले नावाच्या गुंडाने मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून हैवान कसा असतो ते प्रत्येकाने सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीच्या रुपाने पाहिलं. यानंतर जालना जिल्ह्यातल्या एका तरुणाला मारहाण करतानाचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हा सतीश भोसले या आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येत आहे.

Satish Bhosale Video
Pratiksha Patil : 'मस्त जगा, कोणता दिवस शेवटचा असेल...' जळगावच्या प्रतीक्षा पाटीलची मृत्यूपूर्वी मन हेलावणारी पोस्ट

सतीश भोसले नावाचा गुंड एका गरीब व्यक्तीला अमानुष मारहाण करतोय. हा गुंड एकदा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसोबतच दारु पित असताना पकडल्यामुळे एका सरपंचाने याला मारलं होतं. या सतिश भोसलेने १५ दिवसांपूर्वीच बाबी गावातल्या एका व्यक्तीला अशी मारहाण केलीय की त्याचे सगळे दात पडलेत. भोसले हा पारधी समाजाचा असून वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे घडवून आणण्यासाठी त्याचा राजकीय वापर केला जातो. त्याला कोणत्याही पोलीस स्टेशनकडून अटक होत नाही. गुन्हा करायचा आणि आपली दहशत किती आहे हे दाखवण्यासाठी त्याचे व्हिडीओ सुद्धा तयार करायचं हे त्याचं

Satish Bhosale Video
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे सहआरोपी होणार का? कायदा काय सांगतोय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com