Shivshahi Bus Door Not Locked  SaamTV
महाराष्ट्र

Pune News : केबिनला दोरी बांधलेली, एन्ट्रीच्या दरवाजाला लॉक नाही; पुण्यातील 'त्या' शिवशाही बसचं धक्कादायक वास्तव समोर

Pune Swargate Depot Shivshahi Bus : या बसच्या दरवाजाला कुठल्याच प्रकारचं लॉक नाहीय. दरवाजा उघडा असून आतल्या केबिनच्या दरवाजाला देखील लॉक नसून एक दोरी बांधल्याचं उघडकीस आलं आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. ही घटना बस स्थानकात पहाटे ५.३०च्या सुमारास घडली आहे. या घटनेनं संपूर्ण पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. पीडित तरुणीवर ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणीचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत मिळणार आहे.

स्वारगेट बस डेपोमध्ये ज्या शिवशाही बसमध्ये त्या तरुणीवर अत्याचार झाला, त्या बसबाबत एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. ही शिवशाही बस दुसऱ्या डेपोची आहे, दुसऱ्या ठिकाणाहून ही बस आलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या बसच्या दरवाजाला कुठल्याच प्रकारचं लॉक नाहीय. दरवाजा उघडा असून आतल्या केबिनच्या दरवाजाला देखील लॉक नसून एक दोरी बांधल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. तसं पाहिलं तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात बदल; आजपासून काय काय बदललं?

Summer Hair Care : अगदी कमकुवत केससुद्धा दुप्पट वेगाने वाढतील, फक्त १५ दिवस करा 'हा' उपाय

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

How to store coriander: फ्रीजमध्ये ठेवली तरी कोथिंबीर काळी पडतेय? या टीप्सचा वापर करून पाहा

SCROLL FOR NEXT