Pune Swargate Crime : घटनेनंतर तरुणी बसमधून उतरली, नंतर दुसऱ्या बसमध्ये चढली; 'त्या' वेळेत नेमकं काय घडलं?

Pune Swargate Bus Stand Girl Rape : पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. कारण घटनाही तशी घडली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Swargate bus stand 26 year old girl assaulted
Swargate bus stand 26 year old girl assaultedSaamTV
Published On

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. पहाटे ५.३० वाजता पुण्यातील एसटी स्टँडवर धक्कादायक घटना घडली आहे. ही तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती. त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडली. गुन्हा घडल्यावर हा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जातोय.

नेमकी घटना कशी घडली?

या घटनेमुळे पीडित तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यामुळे दत्तात्रय गाडे याने अतिप्रसंग केल्यानंतर ही तरुणी फलटणच्या बसमधून बाहेर पडली आणि दुसऱ्या बसमध्ये चढली. तिथून ती फलटणला आपल्या गावी गेली. तिकडे तिने आपल्या नातेवाईकांना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकाराची तक्रार पोलिसांत केली. त्यानंतर पोलिसांनी स्वारगेट एसटी आगारातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दत्तात्रय गाडे याची ओळख पटवली. यानंतर पुणे पोलिसांची पथके नराधम दत्तात्रय गाडे याचा शोध घेत आहेत.

Swargate bus stand 26 year old girl assaulted
Pune Shivshahi : शिवशाही बसमध्ये बलात्कार, CCTV फुटेज आलं समोर

दत्तात्रय गाडे कोण आहे?

या प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावर आहेत. पोलिसांकडून या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्वारगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रहदारी असते, अशातही आरोपीने या तरूणीवर एसटी बस स्थानकामध्ये असं कृत्य केल्यानं महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Swargate bus stand 26 year old girl assaulted
Pune Crime : ५ वाजून ३८ मिनिटं, पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार; स्वारगेट डेपोमधील CCTV

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com