Rupali Chakankar : माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात; पुणे प्रकरणावरून रुपाली चाकणकर संतापल्या

Rupali Chakankar on Pune case : पुणे अत्याचार प्रकरणावरून महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणावरून एकच संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील अत्याचार प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी एकच संताप व्यक्त केला.
Rupali chakankar News
Rupali chakankarSaam tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यातील एसटी डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पुण्यातील घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तरुणीवर अत्याचाराच्या घटनेची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात, अशा शब्दात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

Rupali chakankar News
Pune Shocking News : धक्कादायक! पुण्यात धावत्या कॅबमध्ये महिलेची छेड, आरशात बघून ड्रायव्हरने केले विकृत चाळे

तरुणीवर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे. पुण्यातील संतापजनक घटनेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला. रुपाली चाकणकर यांनी सर्व महिलांना सुरक्षेचा सल्ला दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी महिलांना आवाहन करत म्हटलं की, 'तरुण मुली, महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये'.

Rupali chakankar News
Pune Accident : कल्याणीनगरमध्ये पुन्हा दोघांना उडवले, एकाचा मृत्यू, चालक फरार

'तुम्ही यंत्रणांची मदत घ्यावी. स्वतःची काळजी घ्यावी. माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपण सतर्क रहावे, असा सल्ला आयोगाने दिला आहे. आता या प्रकरणात या पीडित मुलीच समुपदेशन आणि तसेच जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना दिल्या असल्याची माहिती हाती आली आहे.

Rupali chakankar News
Pune News: पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी थायलंडच्या महिलेचा केला भंडाफोड

रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. पुण्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असतात. पुण्यातील घटनेने वेदना होत आहेत. काल स्वारगेट आगारात ही घटना घडली. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास हाती घेतला. या भागातील संबंधित सीसीटीव्ही आणि आरोपीची ओळख यावरून पोलिसांची ८ पथके तपासावर आहेत. आरोपी पकडला जाईल, पण तरुणीची सुरक्षितता महत्वाची आहे. तिचं आयुष्य लाखमोलाचं आहे. मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कात आहे. वर्दळीच्या भागात अशा घटना घडणे दुर्देवी आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com