Pune News: पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी थायलंडच्या महिलेचा केला भंडाफोड

Hinjewadi IT park crime News: हिंजवडी येथील परदेशी तरूणींकडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी कारवाई करत या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे.
Pune
PuneSaamTvNews
Published On

पुण्यातील हिंजवडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी येथील परदेशी तरूणींकडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी कारवाई करत या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे.

पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकत ४ परदेशी तरूणींची सुटका केली आहे. या प्रकरणात परदेशी दलाल महिलेच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयटी हिंजवडी परिसरात आरोपी परदेशी तरूणी काही तरूणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. जास्त पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवून एक परदेशी महिलेने ४ थायलंड महिलांना भारतात आणले. शिवाय त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. याची गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली.

Pune
Maharashtra politics: शिंदेंवर जहरी टीका अन् फडणवीसांना सल्ला, ठाकरे म्हणाले फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल

माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी एक सापळा रचला, हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासार साई धरणाजवळ एक बंगला बुक केला. त्या बंगल्यात पोलिसांनी एका व्यक्तीला पाठवले. नंतर पोलिसांनी धाड टाकून सेक्स राकेट उघडकीस आणला.

Pune
Pune : शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन टायगर रखडलं, कारण माजी आमदाराने आधीच ठेवली मोठी अट

पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकत ४ परदेशी तरूणींची सुटका केली आहे. नंतर परदेशी दलाल महिलेच्याविरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com