Pune Porsche Car Accident Saam Digital
महाराष्ट्र

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणासंदर्भात मोठी बातमी; आधी अल्पवयीन आरोपीला आणि आता वडील-आजोबांनाही मिळाला जामीन

Pune Porsche Car Accident Update : पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अपघातानंतर ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र विशाल अग्रवालवर ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी हाताशी धरुन अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा आणखी एक गुन्हा नोंद आहे आणि त्या प्रकरणात विशाल आणि शिवानी अग्रवाल पती पत्नी येरवडा कारागृहात आहेत. त्यामुळे विशाल अग्रवालची येरवडा कारागृहातून लगेच सुटका होणार नाही. मात्र सुरेंद्र कुमार अग्रवालचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय आहे.

पुण्यातील कल्याणीनगर चौकात 19 मे रोजी भरधाव पोर्शे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती, मात्र लगेचच जामीन मंजूर करण्यात आला होता. याविरोधात जनआंदोलन उसळ्यानंतर मात्र अल्पवीयन मुलगा त्याच्या आई-वडिलांसह आजोबांवरही पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. जवळपास दीड महिन्यांनंतर अल्पवयीन मुलाला नुकताच जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर आज त्याचा आजोबाला आणि वडिलांना जामीन मंजूर झाला आहे.

आरोपी मुलाच्या आजोबाने चालक गंगारामला गुन्ह्याची जबाबदारी घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच चालकाला बंगल्यात कैद केलं. घरातील काही सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. मात्र सुरेंद्र अग्रवालने, अपघात झाला, त्यावेळी मी पुण्यात नव्हतो. मी वैयक्तिक कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. पोलीस घरी येऊन डीव्हीआर घेऊन गेले असल्याचं सांगितलं होतं.

सध्या अख्ख कुटुंब तुरुगांत आहे. मुलाला कार दिल्याप्रकरणी विशाल अग्रवाल आणि ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवालने ससूनमधील रक्ताचे नमुने बदल्याचं कबूल केलं. त्यामुळे तिलाही अटक करण्यात आली आहे. आपल्या अल्पवयीन मुलाच्या चुकीमुळे अग्रवाल कुटुंब तुरुंगात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT