Nandurbar Crime: लग्नसोहळ्यात अचानक लाईट गेली, अंधाराचा फायदा घेत चोरट्याने डाव साधला; तब्बल साडे सहा लाखांचे दागिने लंपास

Nandurbar Latest News: नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात एक विवाह सोहळा सुरू होता. लग्नसमारंभ सुरू असतानाच अचानकपणे हॉलमधील विद्युत पुरवठा खंडित झाला.
Nandurbar Crime: लग्नसोहळ्यात अचानक लाईट गेली, अंधाराचा फायदा घेत चोरट्याने डाव साधला; तब्बल साडे सहा लाखांचे दागिने लंपास
Nandurbar Latest News: Saamtv
Published On

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. १ जुलै २०२४

विवाह सोहळा सुरू असताना अचानकपणे लाईट गेल्यानंतर अंधाराचा फायदा घेत एका महिलेजवळ असलेली साडे सहा लाखांच्या दागिन्यांची बॅग एका अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदुरबार शहरामध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nandurbar Crime: लग्नसोहळ्यात अचानक लाईट गेली, अंधाराचा फायदा घेत चोरट्याने डाव साधला; तब्बल साडे सहा लाखांचे दागिने लंपास
Raju Shetti News: 'समृद्धी महामार्गामुळे तुमची समृद्धी झाली, आमदारांचा ५० कोटी रेट निघाला', राजू शेट्टींचे CM शिंदेंवर टीकास्त्र!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात एक विवाह सोहळा सुरू होता. लग्नसमारंभ सुरू असतानाच अचानकपणे हॉलमधील विद्युत पुरवठा खंडित झाला. यावेळी स्टेजवर काही काळ अंधार पसरला होता. याचाच फायदा घेत सोन्या-चांदीची दागिने असलेली बॅग अज्ञात व्यक्तीने उचलून नेली.

या बॅगेमध्ये दोन लाख 25 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, तीन लाख 50 हजार रुपये किमतीची पोत आणि 50 हजार रुपये किमतीचे चांदीचे ताट असा एकूण सहा लाख 55 हजार रुपयांचा ऐवज होता. या घटनेने नंदुरबार शहरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात छोट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Nandurbar Crime: लग्नसोहळ्यात अचानक लाईट गेली, अंधाराचा फायदा घेत चोरट्याने डाव साधला; तब्बल साडे सहा लाखांचे दागिने लंपास
Yavatmal Accident Video: नागपूर-यवतमाळ महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात, ४ भाविकांचा जागीच मृत्यू

येरवडा जेलमध्ये महिला कैद्याचा विनयभंग

दरम्यान, पुण्यातील येरवडा जेलमध्ये जाऊन कैदीचा नातेवाईक असल्याचं सांगून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जाहिर बाबा लहुरी यांच्यावर येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भेटायला आलेला व्यक्ती हा आरोपीचा नातेवाईक नाही असे महिला जेल कर्मचाऱ्यांना सांगण्यासाठी गेली होती, तेव्हा तिच्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार घडला आहे.

Nandurbar Crime: लग्नसोहळ्यात अचानक लाईट गेली, अंधाराचा फायदा घेत चोरट्याने डाव साधला; तब्बल साडे सहा लाखांचे दागिने लंपास
Cyber Crime : शेतकऱ्याची ९५ लाखांत फसवणूक; शेअर मार्केटमध्ये ज्यादा पैसे कमविण्याचे आमिष

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com