Raju Shetti News: 'समृद्धी महामार्गामुळे तुमची समृद्धी झाली, आमदारांचा ५० कोटी रेट निघाला', राजू शेट्टींचे CM शिंदेंवर टीकास्त्र!

Shaktipeeth Expressway Latest News: नांदेडच्या मालेगाव येथे शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते.
Raju Shetti News: 'समृद्धी महामार्गामुळे तुमची समृद्धी झाली, आमदारांचा ५० कोटी रेट निघाला', राजू शेट्टींचे CM शिंदेंवर टीकास्त्र!
Raju Shetti|CM Eknath ShindeSaam tv

संजय सूर्यवंशी, नांदेड|ता. १ जुलै २०२४

नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गाला सध्या मोठा विरोध पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेते या महामार्गाविरोधात एकवटले असून हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

Raju Shetti News: 'समृद्धी महामार्गामुळे तुमची समृद्धी झाली, आमदारांचा ५० कोटी रेट निघाला', राजू शेट्टींचे CM शिंदेंवर टीकास्त्र!
Yavatmal Accident Video: नागपूर-यवतमाळ महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात, ४ भाविकांचा जागीच मृत्यू

नांदेडच्या मालेगाव येथे शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी समृद्धी महामार्गावरुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

काय म्हणाले राजू शेट्टी?

समृद्धी महामार्गामुळे तुमची समृद्धी झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना रस्ते करायची सवय लागली, असा खोचक टोला राजू शेट्टी यांनी लगावला. तसेच समृद्धी महामार्गामुळे आमदाराचा रेट 50 कोटी निघाला. दोन वर्षांपूर्वी आमदारांचा रेट ५० कोटी निघाला, असे ऐकायला मिळाल्याचेही राजू शेट्टी म्हणाले.

Raju Shetti News: 'समृद्धी महामार्गामुळे तुमची समृद्धी झाली, आमदारांचा ५० कोटी रेट निघाला', राजू शेट्टींचे CM शिंदेंवर टीकास्त्र!
Maharashtra Politics : लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीचं उदाहरण देत ठाकरे गटाचे अजित पवारांना चिमटे

" तसेच समृद्धी महामार्गामुळे आर्थिक समृद्धी आली. आता पुन्हा एकदा त्यांना आर्थिक शक्ती प्राप्त करायची आहे. त्यामुळेच हा शक्तिपीठ महामार्ग होत असून तो आपल्यासाठी नाही," अशी टीका करत मागणी नसताना हा महामार्ग कशासाठी? याचं मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले.

Raju Shetti News: 'समृद्धी महामार्गामुळे तुमची समृद्धी झाली, आमदारांचा ५० कोटी रेट निघाला', राजू शेट्टींचे CM शिंदेंवर टीकास्त्र!
Maharashtra Vidhan Parishad Election: विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार? आमदार फुटण्याची महायुतीला भीती, पडद्यामागे काय घडतंय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com