Pune News Maval Farmers Oppose Pune Ring Road saamtv
महाराष्ट्र

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Pune News Maval Farmers Oppose Pune Ring Road : पुणे रिंगरोड प्रकल्पाला मावळच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध दर्शवलाय. एक्सप्रेस वे आणि पवना धरणासाठी एकर जमीन गमावल्यानंतर शेतकरी जमीन देण्यास नकार देत आहेत. हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

Bharat Jadhav

  • मावळ तालुक्यात रिंग रोडसाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध.

  • सांगवडे, दारुंबरे, साळुंबरे यांसह अनेक गावे बाधित होणार.

  • याआधीच द्रुतगती महामार्ग व पवना धरणासाठी जमिनी दिल्याने शेतकरी अल्पभूधारक झाले.

दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी

मावळ तालुक्यात प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पावरून शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. सांगवडे, दारुंबरे, साळुंबरेसह अनेक गावांतील शेतकऱ्यांनी एकमुखाने रिंग रोडला तीव्र विरोध दर्शविला असून, “जीव गेला तरी चालेल पण एक इंचही जमीन देणार नाही” असा इशारा सरकारला दिला आहे. याआधी पवना धरण, मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गामुळे अल्पभूधारक झालेल्या शेतकऱ्यांच्या मते, आता पुन्हा सुपीक जमिनी संपादित झाल्यास पुढच्या पिढीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल.

मावळ तालुक्यातील जांबे येथून रिंग रोडला सुरुवात होणार असून मावळ तालुक्यातील सांगवडे, दारुंबरे, साळुंबरे, यासह अनेक गावे या रिंग रोड मुळे बाधित होणार आहेत. त्यामुळे या रिंग रोडला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध दर्शविला आहे. याआधीच मावळतील शेतकऱ्यांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, पवना धरण याला जमिनी दिल्या त्यामुळे हे शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. आत्ता सरकारने रिंग रोड तयार करण्याचा घाट धरलेले आहे. मात्र या रिंग रोड साठी आमचा जीव गेला तरी चालेल पण एकही इंच जमीन आम्ही रिंग रोडला देणार नाही, असा पवित्रा घेतलाय.

याआधी याभागात झालेल्या पवना धरणावेळी अनेक शेतकऱ्यांना त्याचा परतावा मिळालेला नाहीये. हे उदाहरण ताजे असताना सरकार रिंग रोडचा प्रकल्प राबवणार आहे. त्यामुळे शेतकरी खूप आक्रमक झाले आहेत. पवना धरण तयार करीत असताना अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या मात्र त्याचाही परतावा मिळाला नाही. ही बाब लक्षात घेता हा रिंग रोड त्वरित रद्द करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. त्यावेळी आंदोलन करीत असताना तीन शेतकऱ्यांचा बळी या राज्य सरकारने घेतला होता. खबरदार जर आमच्या जमिनीला हात लावाल तर, असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.

आम्ही आता अल्पभूधारक आहोत आणि त्यातही आमची ही जमीन जर सरकारने घेतली तर पुढच्या पिढीचं काय करायचं? असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी सरकारला विचारला आहे. बिल्डर आणि राज्य सरकार यांची मिलीभगत आहे. 90 मीटरच्या या रस्त्यामुळे सुपीक बागायती शेत जमीन तसेच अल्पभूधारकांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेजवर गदा येणार आहे, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आज मावळच्या सांगवडे येथे बाधित शेतकऱ्यांनी बैठक घेऊन एक मुखाने या रिंग रोडला विरोध दर्शविला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बदलापुरात गणेशोत्सवासाठी मोफत बस सेवा

BJP Mumbai President : BMC निवडणुकीआधी भाजपची मोठी घोषणा, मुंबई भाजप अध्यक्ष निवडला, कुणाला मिळाली संधी?

सिंहगडावरून खाली कोसळला, CCTVच्या मदतीनं गायकवाडला शोधलं, ५ दिवस नेमका कुठे होता? पोलिसांना वेगळाच संशय

Bhiwandi Traffic : भिवंडीमध्ये वाहतुकीत मोठा बदल, शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी, पर्यायी मार्ग कोणते? वाचा

Pranit More : 'महाराष्ट्रीयन भाऊ'ची 'Bigg Boss 19'च्या घरात धमाकेदार एन्ट्री, कोण आहे प्रणित मोरे?

SCROLL FOR NEXT