Tractor Subsidy Scheme: अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दारी येणार ट्रॅक्टर; सरकार देणार ४०% अनुदान, जाणून घ्या योजनेची A To Z माहिती

krushi yantrikikaran yojana maharashtra 2025: महाराष्ट्र सरकारने शेतीचे आधुनिकीकरण आणि उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केलीय. सरकार ट्रॅक्टरवर अनुदान देण्यासाठी शेती यांत्रिकीकरण अनुदान योजना सुरू केली आहे.
Krushi News
Krushi NewsSaam Tv News
Published On
Summary
  • महाराष्ट्र सरकारनं अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरसाठी १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे.

  • महागड्या यंत्रसामग्रीमुळे अनेक शेतकरी आधुनिक शेती करू शकत नाहीत, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

  • या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून अधिक नफा मिळवून देणं आहे.

  • ही योजना कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजनेंतर्गत राबवली जात आहे.

राज्य सरकारने लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना सुरू केलीय. या योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी सरकार भरघोस अनुदान देते. सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देते. महागड्या किमतीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करणं आर्थिकदृष्ट्या कठीण असतं. त्यामुळे सरकारनं ही योजना सुरू केलीय.

मात्र या योजनेमुळे शेतकऱ्यांना यंत्र सामग्री घेणं शक्य होत असतं. याच योजनेतून सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आवश्यक आर्थिक मदत देणार आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे, त्याद्वारे शेतीतील उत्पादनात वाढ करणे. शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देणे हा आहे. या योजनेमुळे शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढवेल.

शेतीचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवणे. शेतीत काम करताना शेतकऱ्यांचे शारीरिक ताण कमी होईल.शेतीच्या कामातील वेळ आणि मेहनत वाचवेल. शेतकऱ्यांचा आर्थिक ताण हलका करण्यासह कमी जमिनीवर अधिक उत्पादन घेण्यास मदत करणे.

कसे असेल अनुदान?

महिला शेतकरी, अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना ५०% अनुदान दिली जाईल.

ट्रॅक्टरसाठी अनुदान मर्यादा: १ लाख २५ हजार

इतर सर्व शेतकऱ्यांसाठी ४०% अनुदान दिल जाईल.

ट्रॅक्टरसाठी अनुदान मर्यादा: १ लाख रुपये आहे.

Krushi News
हिरोला टक्कर देणार होंडा! नवीन Shine 100 DX बाईक लॉन्च; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

कोणाला मिळतो लाभ

या योजनेत एका वेळी शेतकऱ्याला फक्त एका यंत्रासाठी अनुदान.

जर शेतकऱ्याने पूर्वी ट्रॅक्टरसाठी अनुदान घेतले असेल, तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टर घेण्यास ते अर्ज करू शकत नाहीत.

पण शेतकरी इतर नवीन यंत्रांसाठी अर्ज करू शकतो.

जर कुटुंबातील कोणाच्या नावावर ट्रॅक्टर असेल, तर त्या ट्रॅक्टरवर चालणाऱ्या अवजारांसाठीही शेतकऱ्यांना अनुदान मिळते. त्यासाठी फक्त ट्रॅक्टरच्या मालकीचा पुरावा द्यावा लागतो.

Krushi News
Aadhaar, PAN Card भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही; कोणत्या कागदपत्राद्वारे सिद्ध होणारं तुमचं नागरिकत्व? जाणून घ्या

कसा कराल अर्ज

ऑनलाईन अर्जासाठी लिंक: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन आवश्यक माहिती घेऊन मार्गदर्शनाखाली अर्ज करावा.

Q

ही योजना कोणासाठी आहे?

A

ही योजना लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे.

Q

या योजनेत किती अनुदान मिळते?

A

सरकारकडून ट्रॅक्टरसाठी १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते.

Q

या योजनेचा उद्देश काय आहे?

A

शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून शेतीतील उत्पादनवाढ आणि नफा वाढवणे.

Q

ही योजना का गरजेची आहे?

A

महागड्या किंमतीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना साधनं खरेदी करणं कठीण होतं, म्हणून सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com