पुणे : राज्यभर कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळू लागले आहेत. मात्र ते रुग्ण माईल्ड स्वरूपाचे आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल (Pune News) व्हायची वेळ आलेली नाही. मात्र तरीही खबरदारी म्हणून शासन प्रत्येक रुग्णालयात बेड आरक्षित करून ठेवत आहेत. अचानक जर रुग्णांना भरती करावे (Corona) लागले तर ऐनवेळी धांदल उडू नये. त्याअनुषंगाने आज पुणे जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्याने औंध जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली आहे. (Tajya Batmya)
राज्यभर जिथं-जिथं तयारी केली होती. त्याठिकाणी बेड, ऑक्सिजन, स्टाफ सुविधा उपलब्ध आणि औषधं उपलब्ध आहेत का? याची चाचपणी यावेळी करण्यात आली. याबाबतची इत्यंभूत माहिती लवकरच वेबसाईटवर अपलोड केली जाईल. केंद्र सरकारने ही सूचित केलंय, पण तत्पूर्वीच राज्य सरकारने असे मॉक ड्रिल सुरू केले आहेत; अशी माहिती डॉ. अंबाडेकर यांनी दिली.
पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात आज मॉक ड्रिल घेण्यात आली. कोरोना रुग्णांसाठीचे शंभर बेड सुस्थितीत आहेत का ऑक्सिजनची व्यवस्था आहे का? स्टाफ तैनात आहे का? याबाबतची चाचपणी यावेळी करण्यात आली. यासाठी औंध जिल्हा रुग्णालयात आज पुणे विभागाचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.