Jalgaon Cotton Price: आवक मंदावल्याने कापसाच्या दरात सुधारणा; मिळतोय इतका दर

आवक मंदावल्याने कापसाच्या दरात सुधारणा; मिळतोय इतका दर
Cotton Price
Cotton PriceSaam tv
Published On

पारोळा (जळगाव) : कापूस दरात सुधारणा झाली असून, प्रतिक्विंटर सुमारे आठ हजारांपर्यंत पोचले आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश येथे कापसाची (Cotton) आवक कमी झाल्याने हा भाव मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे. यामुळे (Farmer) शेतकऱ्यात आनंद निर्माण झाला आहे. दरम्यान, येणाऱ्या आठ, दहा दिवसांत कापसाचे दर प्रतिक्विंटल वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Cotton Price
NCP Corporator Son Arrested: NCP नगरसेवकाच्या मुलास अटक; कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचा ठपका

जिल्ह्यात भाव वधारेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला. मागील महिन्यापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. अमळनेर, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, बोदवड, चोपडा आदी भागांतही किमान ७० टक्केच विक्री झाली. मागील महिन्यात कापसाला भाव (Cotton Price) कमी असल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी निर्माण झाली होती. किंबहुना शेतकरी हा आपला माल घरातून विक्रीस काढत नव्हता. त्यामुळे कापसाची आवक बाजारात मंदावली. याचा फायदा उर्वरित शेतकऱ्यांना होत असून, कापसाचे शनिवारचे (ता. ८) दर प्रतिक्विंटल आठ हजार ते आठ हजार पन्नास असे झाले असून, हे दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

Cotton Price
Kolhapur News : शेतातून घरी येताच जवानाने उचललं टाेकाचं पाऊल; सुट्टीसाठी गावी आले हाेते शिवानंद आरबोळे

मागील वर्षी पांढऱ्या सोन्याला प्रतिक्विंटल अकरा हजार ते बारा हजार रुपये दर होता. त्यामुळे यावर्षी देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात इतर पीक न घेता कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र यंदा कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्यामुळे मध्यमवर्गीय शेतकरी यांनी गरजेपुरता कापूस विक्रीस काढला होता. तसेच बरेच शेतकऱ्यांनी आपल्या घरातच कापसाला सुरक्षित ठेवत भाव वाढीकडे प्रतीक्षा केली होती. मात्र बऱ्याच वेळा अवकाळी पावसामुळे तसेच बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे उच्च प्रतीच्या कापसाला साधारणपणे साडेसात हजारापर्यंत भाव होता. मात्र भाव पुन्हा वाढल्याने शेतकऱ्यांनी भाऊगर्दी करत गरजेपुरता माल विक्रीस काढला होता. दरम्यान, परिस्थिती अशीच राहिली तर साधारणपणे कापसाला प्रतिक्विंटल आठ ते नऊ हजारादरम्यान दर मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com