Kolhapur News : शेतातून घरी येताच जवानाने उचललं टाेकाचं पाऊल; सुट्टीसाठी गावी आले हाेते शिवानंद आरबोळे

या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलीस ठाण्यात झाली आहे.
Kolhapur
Kolhapursaam tv
Published On

Gadhinglaj News : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील तनवडी येथील शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (jawan shivanand arbole) (वय 23) या जवानाने रविवारी दुपारी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्तेचे कारण समजू शकली नाही. (Maharashtra News)

Kolhapur
Corona चा धाेका वाढला, साता-यानंतर 'या' जिल्ह्यात बॅंक, शाळांसह महाविद्यालयांत मास्क वापर अनिवार्य

सध्या राजस्थान येथील कोठा येथे कार्यरत असणारे शिवानंद आरबोळे हे पंधरा दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. शेतकरी असलेले आरबोळे हे रविवारी सकाळी आपल्या कुटुंबासोबत शेताकडे गेले होते. शेतातच जेवण करून आंघोळीसाठी घरी जातो असे सांगून ते घरी परत आले होते.

Kolhapur
Market Committee Election News :सर्वांत माेठी बातमी; बाजार समितीच्या निवडणुकीस स्थगिती, न्यायालयाचा आदेश

त्यांनी घरी पाेहचल्यानंतर आत्महत्या केली. ही घटना समजताच स्थानिक लोकांनी त्यांना तातडीने गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी जवान शिवानंद यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद काेल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलीस ठाण्यात झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com