Child Marriage In Latur: अल्पवयीन मुलीशी लग्न; पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीशी लग्न; पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल
Child Marriage
Child MarriageSaam tv
Published On

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा शहरातून धक्कादायक घटना समोर आलीय. औसा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह (Child Marriage) करण्यात आला. दरम्यान सदरील विवाहितेने लातूर (Latur News) इथं एका बाळाला जन्म दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. यावरून पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला तर आईवडील सासू सासरे यांच्या विरोधात अल्पवयीन लग्न लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Live Marathi News)

Child Marriage
Satej Patil News : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला महाडिक भ्याले... सतेज पाटलांचा घणाघात

कोरोना काळापासून ग्रामीण भागात अल्पवयीन मुलामुलींच्या विवाहात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. औसा तालुक्यातील एका गावातील चौदा वर्षांची अल्पवयीन मुलीचा विवाह १ जुलै २०२२ मध्ये लावण्यात आला. पतीला आपली पत्नी अल्पवयीन असल्याची माहिती असून देखील वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यात सदरील अल्पवयीन विवाहिता गरोदर राहिली.

Child Marriage
Jalgaon Cotton Price: आवक मंदावल्याने कापसाच्या दरात सुधारणा; मिळतोय इतका दर

त्‍या मुलीने लातूर येथील लेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालयात मुलाला जन्म दिला. यानंतर बालविवाह झाल्‍याचे समोर आले. याप्रकरणी औसा पोलिसांत पती, सासू आणि सासरे यांच्यासह विवाहितेची आई– वडील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकवाड करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com