Police investigation underway after a mother allegedly murdered her 6-year-old son in Pune and attempted to disguise the crime as a natural death in Beed. Saam tv
महाराष्ट्र

पुण्यात मारले अन् बीडमध्ये अंत्यविधीला नेलं, आईनेच घेतला पोटच्या लेकराचा जीव, धक्कादायक कारण समोर

Mother Kills Child Due To Affair In Pune: पुण्यात आईने प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मृतदेह बीडमध्ये नेऊन नैसर्गिक मृत्यूचा बनाव करण्याचा प्रयत्न, मात्र अंत्यविधीवेळी सत्य बाहेर आलं.

Omkar Sonawane

प्रेमसंबधात अडचण ठरत असल्याने 6 वर्षाच्या चिमूकल्याची त्याच्याच आईने प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या संपूर्ण घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये कुरुळीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. 27 वर्षांची आई बसरिन शेखचे विनायक कजेवाडसोबत प्रेमसंबंध होते. हे दोघेही गेल्या 4 महिन्यांपासून कुरुळीमध्ये एकत्र राहत होते. मात्र या दोघांच्या प्रेमसंबंधात बसरिनचा 6 वर्षांचा मुलगा आवेज हा अडचण ठरत होता. यामुळे 4 एप्रिलला रात्री 11.30 वाजता आईने प्रियकराच्या मदतीने आपल्याच मुलाची हत्या करण्याचे ठरवले.

या दोघांनी अत्यंत क्रूरपणे आवेजची हत्या केली. त्यांनी आधी मुलाचे डोके बाथरूममधील पाण्याच्या बादलीत बुडवले आणि त्यानंतर त्याचे डोके भिंतीवर आणि जमिनीवर जोरात आपटले. यामध्ये लहानग्या आवेजचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक कृत्यानंतर आरोपीनी या हत्येला नैसर्गिक मृत्यू वाटेल असा प्लॅन केला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून मुलाचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला असे सांगण्यात आले.

पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांपासून बचाव करण्यासाठी बसरिसने एक प्लॅन केला. ती आवेजचा मृतदेह घेऊन थेट आपल्या माहेरी बीडला गेली. तिथे तिने नातेवाईकांना मुलाचा मृत्यू आजारी असल्याने झाला असे सांगितले आणि लवकरात लवकर अंत्यविधीसाठी नातेवाईकांना बोलावून घेतले.

अन् बिंग फुटल..;

अंत्यविधीसाठी आलेल्या आवेजच्या आजोबांना मृतदेह पाहून संशय आलामुलाच्या शरीरावरील खुणा पाहून त्यांना काहीतरी घातपात वाटला. त्यांनी लगेचच् पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यामध्ये अवेजचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या तर तिचा प्रियकर राम अद्याप फरार् असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दीड तास लिफ्टमध्ये अडकलेल्या चार तरुणांची खारघर अग्निशमन दलाकडून थरारक सुटका

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा! 'या' तारखेला जमा होणार मे महिन्याचे पैसे; ३४५ कोटी मंजूर

Actor Death : मनोरंजन सृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्याचे मुंबईत निधन

Maharashtra ST Bus: ... तर एसटी बसमधील अर्ध्या तिकीटावरचा प्रवास होणार बंद, आत्ताच करा हे काम

पावसाळ्यात कपड्यांचा कुबट वास येतो? या समस्येपासून कशी कराल सुटका?

SCROLL FOR NEXT