पुस्तकांच्या नावाखाली पालकांना कोट्यवधींचा गंडा; 'साम' इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक माहिती समोर

Education Mafia : साम टीव्हीनं पालकांची लूट करणाऱ्या शिक्षण माफियांचा भांडाफोड केल्यानंतर आता चक्रावून टाकणारी माहिती समोर आलीय. खासगी शाळा पुस्तक विक्रीच्या नफेखोरीतून कसे नवे शिक्षण सम्राट उभे करत आहे.त्याचा पर्दाफाश करणारा साम टीव्हीचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट.
Education Mafia :
Parents protest against private schools over alleged book scam and rising education costs.saam tv
Published On

साम टीव्हीनं शिक्षण माफियांकडून पालकांची होत असलेल्या लुटीचा पर्दाफाश केला. मात्र त्यानंतर राज्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी माहिती समोर आलीय. खासगी शाळा, विद्यार्थ्यांची संख्या आणि पालकांची लूट करत राज्यात नवे शिक्षण सम्राट तयार होताहेत.मात्र पुस्तकांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं साम्राज्य कसं उभं केलं जातं. त्याची माहितीच साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशनमधून समोर आलीय.

Education Mafia :
Novel: 'ते पन्नास दिवस' पुस्तकाचा वाद काय? अमरावती विद्यापीठाने अभ्यासक्रमातून का हटवली कादंबरी?

पूर्व प्राथमिक ते आठवीपर्यंतच्या राज्यात 18 हजार 770 खासगी शाळा आहेत.प्रत्येक शाळेत के जी ते आठवीपर्यंत 10 इयत्ता होतात. प्रत्येक इयत्तेच्या किमान 4 तुकड्या असतात. तर प्रत्येक तुकडीत किमान 50 विद्यार्थी असल्याने प्रत्येक इयत्तेत 200 विद्यार्थी असण्याची शक्यता आहे. या प्रमाणे प्रत्येक शाळेत अंदाजे किमान 2 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना पुस्तकं आणि वह्यांसाठी साडेतीन ते दहा हजार रुपयांचा खर्च येतो.

Education Mafia :
SSC- HSC Result: दहावी- बारावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा? अधिकृत वेबसाइटची यादी वाचा

त्यामुळे सरासरी 5 हजारांचा खर्च विचारात घेतला तरी एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून 1 कोटी रुपये होतात. यानुसार राज्यात खासगी शाळा पुस्तकांच्या माध्यमातून पालकांकडून 8-10 हजार कोटींची लूट करत असल्याचं समोर आलंय. आणि तोसुद्धा एनसीईआरटीचे नियम पायदळी तुडवून.

खासगी शाळा त्यांनी नेमून दिलेल्या दुकानातूनच पुस्तकं, वह्या, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य घेण्याची सक्ती करत असल्याचं साम च्या इन्व्हेस्टिगेशनमधून समोर आलंय. मात्र या सक्तीमागे असते ती कमिशनखोरीची मोडस ऑपरेंडी. याबाबत पालक संघटनेनं खासगी शाळांवर गंभीर आरोप केलाय. फक्त पुस्तकंच नाही तर गणवेश, शूज, दप्तर अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून खासगी शाळा नफेखोरी करुन गब्बर बनत आहेत. त्यामुळे नफेखोरी करणाऱ्या, पालकांवर हजारोंची पुस्तकं खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या आणि हजारो कोटींची लूट करणाऱ्या शाळांवर शिक्षण खात्यानं कारवाई करण्याची गरज आहे.

कारण सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून शेण आणि चिखलाचे गोळे झेलणाऱ्या सावित्रीबाई फुले. गळ्यातलं मंगळसुत्रं गहाण टाकून वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करणाऱ्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी त्यागातून शिक्षणाची गंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत आणलीय. ती आटू नये याची काळजी शिक्षण खात्यानं घ्यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com