pujari mandal from tuljapur demands police action on bogus pujari in tuljabhavani mandir Saam Digital
महाराष्ट्र

Tuljapur : भाविकांनो, सावधान! तुळजापुरात बोगस पुजाऱ्यांचा सुळसुळाट, फसवणूक टाळण्यासाठी VIDEO पाहा

Tuljabhavani Temple : ज्यांच्याकडे मंदीर संस्थानचे अधिकृत ओळखपत्र नाही अशा बोगस पुजाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पुजारी मंडळाच्या वतीने पाेलिस दलाकडे करण्यात आली आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

तुळजापूर मधील बोगस पुजाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी नुकतीच पुजारी मंडळाने पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे दिली आहे. उन्हाळी सुटी निमित्त सध्या तुळजापूर येथे भाविकांची माेठी गर्दी आहे. देवीच्या दर्शनाला येणा-या भाविकांची काही बाेगस पुजा-यांकडून फसवणुक हाेत असल्याचा दावा पुजारी मंडऴाने केला आहे.

तुळजापुर शहरात बोगस पुजाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्याकडुन भाविकांची फसवणूक करण्यात येत आहे. मंदीर संस्थानचे अधिकृत ओळखपत्र नसणाऱ्या बोगस पुजाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पुजारी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान रात्री अपरात्री आलेल्या भाविकांची बोगस पुजाऱ्यांकडुन फसवणुक करण्यात येत आहे. बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, कमानवेस या चौकात फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ओळखत्र नसलेल्या बोगस पुजाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पुजारी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

Student Letter : "ताईंची बदली करू नका", शिक्षिकेसाठी तिसरीच्या विद्यार्थ्याचं शरद पवार यांना भावनिक पत्र

Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार

Stress Relief At Work: ऑफिसच्या खुर्चीवर बसून करा 'ही' योगासने

SCROLL FOR NEXT