Prashant Koratkar Saam tv
महाराष्ट्र

Prashant Koratkar : शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य, प्रशांत कोरटकरवर ६ कलमांतर्गत गुन्हा, FIR मध्ये नेमकं काय काय?

Prashant Koratkar Arrested: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. प्रशांत कोरटकरविरोधात कोल्हापूर पोलिसांनी ६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कलमं नेमकी कोणती ते घ्या जाणून...

Priya More

अक्षय बडवे, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली. तेलंगणातून प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली असून त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आले आहे. प्रशांत कोरटकरची वैद्यकीय तपासणीनंतर त्याला कोल्हापूर कोर्टात हजर केले जाणार आहेत. प्रशांत कोरटकर गेल्या महिनाभरापासून फरार होता.

प्रशांत कोरटकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचसोबत त्याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती. याप्रकरणी प्रशांत कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार होता. जामीनासाठी त्याने कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते अखेर तो तेलंगणात सापडला.

प्रशांत कोरटकरविरोधात पोलिसांनी ६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रशांत कोरटकरवर भारतीय न्याय संहिता अन्वये ६ कलमं दाखल करण्यात आले होते. ही कलमं नेमकी काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

१. कलम १९६: धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे.

२. कलम १९७: धार्मिक, वांशिक, भाषिक, प्रादेशिक, जातीय किंवा सामुदायिक भेदांवर आधारित विसंगती निर्माण करून किंवा द्वेष पसरवून राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचवणारी कृती किंवा विधाने.

३. कलम २९९: एखाद्या गट किंवा वर्गाच्या धार्मिक श्रद्धा किंवा भावनांचा अपमान करण्याच्या हेतूने केलेली कृत्ये.

४. कलम ३०२: जो कोणी जाणीवपूर्वक कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने, कोणताही शब्द उच्चारला किंवा त्या व्यक्तीकडे कोणताही प्रकारचा आवाज काढला किंवा त्या व्यक्तीच्या नजरेतून कोणतेही हावभाव केले किंवा त्या व्यक्तीच्या नजरेत कोणतीही वस्तू ठेवली तर त्याला एक वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा.

५. कलम १५१: कोणताही कायदेशीर अधिकार वापरण्यास भाग पाडण्याच्या किंवा निरुद्ध (रोखणे) करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपती, राज्यपाल इत्यादींवर हमला.

६. कलम ३५२: जो कोणी हेतुपुरस्सर कोणत्याही प्रकारे अपमान करतो आणि त्याद्वारे कोणत्याही व्यक्तीला चिथावणी देतो, अशा चिथावणीमुळे सार्वजनिक शांतता भंग होईल किंवा इतर कोणताही गुन्हा केला जाईल अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT