Sharad Pawar Banner In Beed Saam Tv
महाराष्ट्र

Beed Sharad Pawar: 'फोटो लावण्याशिवाय पर्याय नाही, तुमच्यात हिंमत नाही का?', शरद पवारांच्या फोटोंवरुन राजकारण तापलं

Sharad Pawar Banner In Beed: बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेसोबतच अजितदादा गटांनी लावलेले भावनिक बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.

Priya More

विनोद जिरे, बीड

Beed News: बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेसोबतच अजितदादा गटांनी (Ajit Pawar Group) लावलेले भावनिक बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. यावर शरद पवार गटांच्या नेत्यांनी मात्र साहेबांचा फोटो लावण्याशिवाय पर्याय नाही. तुमच्यात धमक आणि हिंमत नाही का? असा सवाल उपस्थित केलाय.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची बीडमधील सभा शक्तिप्रदर्शन करणारी ठरली आहे. यात अजित पवार गटावर टीकास्त्र डागले. मात्र या सभेच्या अगोदर अजित पवार गटांकडून बीड शहरभर लावलेल्या स्वागताच्या भावनिक बॅनर आणि कटऑट्सवरुन राजकारण चांगलेच तापलं आहे.

पवारसाहेब आमचे दैवत आहेत. त्यांनी कामाचा माणूस आणि आपला माणूस असलेल्या अजितदादांना आशीर्वाद द्यावा. एवढीच अपेक्षा आहे. म्हणून बॅनर लावल्याचे अजितदादा पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे यांनी सांगितलं. तर, साहेब आमचे दैवत आहेत. आमच्या श्रद्धेला कोणी नाकारू शकत नाही, असं म्हणत अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी ओबिसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी प्रतिक्रिया दिली.

बीडमध्ये शरद पवारांसाठी अजित पवार गटाकडून भावनिक बॅनर लावले याचा रोहित पवार यांनी चांगलाच समचार घेतला. साहेबांचा फोटो लावण्याशिवाय पर्याय नाही. फुटून गेलात मग शरद पवारसाहेब तुम्हाला कशाला हवेत. तुमच्यात धमक आणि हिंमत नाही का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

तर पवारसाहेबांच्या फोटोवरुन जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत आणि जितेंद्र आव्हाड यांनी जाहिर भाषणातून सडकून टीका केली आहे. या दोन्ही नेत्यांनी देखील अजित पवार गटाला खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान बीडच्या सभेपूर्वीच अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनरवरून आता चांगलंच राजकारण तापलं आहे. तर यापुढे फोटो वापरला तर कोर्टात जावं लागेल. असं देखील शरद पवार यांनी सांगितलंय. यामुळे आता या फोटोचं भावनिक राजकारण कुठपर्यंत जाणार? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

SCROLL FOR NEXT