Rivaba Jadeja Angry: रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांना राग अनावर, आधी महापौर नंतर खासदारावर संतापल्या; नेमकं कारण काय?

Gujarat Political News: जामनगर शहरातील एका कार्यक्रमात क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी आणि आमदार रिवाबा जडेजा यांना राग अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
Rivaba Jadeja
Rivaba Jadeja Saam Tv
Published On

BJP MLA Rivaba Jadeja Angry: गुजरातच्या (Gujarat) जामनगरमध्ये भाजपच्या तीन महिला नेत्यांची आपापसात भांडण झाल्याची घटना समोर आली आहे. गुजरात भाजपमधील भांडण आणि प्रचारानंतर जामनगरमध्ये (Jamnagar) तीन महिला नेत्यांमधील सार्वजनिक ठिकाणी तू-तू मैं मैं यामुळे पक्षात नवी फूट निर्माण झाली आहे.

नुकताच जामनगर शहरातील एका कार्यक्रमात क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी आणि आमदार रिवाबा जडेजा (mla rivaba jadeja) यांना राग अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. सार्वजनिक ठिकाणी रिवाबा आधी महापौरांवर संतापल्या. त्यानंतर त्या खासदारांवर देखील संतापल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल (Viral Video) मीडियावर व्हायरल होत आहे.

Rivaba Jadeja
Sharad Pawar On Modi Government: 'आता वेळ आलीय...', बीडच्या सभेत शरद पवार कडाडले

मिळालेल्या माहितीनुसार, रिवाबा जडेजा आणि जामनगरच्या महापौर बीना कोठारी यांच्यामध्ये काही कारणांवरुन वाद झाला. त्यानंतर महापौरांनी रिवाबाा यांना 'शिस्तीत राहायचे, जास्त स्मार्ट व्हायचे नाही', असे म्हटले. त्यानंतर रिवाबा यांना खूपच राग आला. त्या महापौरांवर संतापल्या. रिवाबा आणि महापौरांचा वाद पाहता खासदार पूनम माडम या वाद मिटवण्यासाठी मध्ये आल्या. तर आमदार रिवाबा त्यांच्यावर देखील संतापल्या. हा सगळा वाद तुमच्यामुळेच झाला असल्याचे म्हणत रिवाबा यांनी खासदारांना सुनावले.

Rivaba Jadeja
Mumbai Covid Scam: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना मुंबई पोलिसांनी केली अटक

जामनगर शहरातील लखोटा तलाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'माझी माती, माझा देश' या मोहिमेअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जामनगरच्या खासदार पूनमबेन माडम आणि जामनगरच्या महापौर बिनाबेन कोठारी यांच्यासह भाजप आमदार रिवाबा जडेजाही कार्यक्रमाला पोहोचल्या. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यामुळे आमदार रिवाबा जडेजा आणि महापौर बिनाबेन कोठारी यांच्यात काही कारणावरून बाचाबाची झाली.

Rivaba Jadeja
Gadar 2 Movie Show : 'गदर- २' बघायला थिएटरमध्ये गेले, 'गदर - ३' बघून आले; मॉलमध्येच कुटाकुटी, VIDEO व्हायरल

भाजपच्या तीन महिला नेत्यांचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यांच्या वादाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या समोरच या तिन्ही महिला नेत्या आपापसात भांड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या गुजरातमध्ये हा विषय चर्चेचा ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com