Petrol Diesel Price News: पेट्रोल-डिझेलचे कमी होणार दर? मोदी सरकार घेऊ शकते मोठा निर्णय, वाचा...

Central Government News: पेट्रोल-डिझेलचे कमी होणार दर? मोदी सरकार घेऊ शकते मोठा निर्णय, वाचा...
Petrol Diesel Price News
Petrol Diesel Price NewsSaam Tv
Published On

Petrol Diesel Price News: देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. महागाईचा मोठा फटका हा सामान्यांना पडत आहे. अशातच जुलै महिन्यात देशातील महागाईचा दर 15 महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. सध्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान केंद्र सरकार समोर आहे.

महागाई कमी करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलण्याचा तयारीत आहे. केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Petrol Diesel Price News
Mumbai Covid Scam: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना मुंबई पोलिसांनी केली अटक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याच्या नियोजनात व्यस्त आहे. गेल्या वेळी देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यात आले होते. 21 मे रोजी अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला होता. (Latest Marathi News)

यावेळीही सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या करात मोठी कपात करण्याची शक्यता आहेत. केंद्र सरकारने कपात केल्यानंतर राज्यांवर कर कमी करण्याचा दबाव वाढणार आहे. त्यामुळे राज्यानुसार देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे.

Petrol Diesel Price News
Sharad Pawar On Modi Government: 'आता वेळ आलीय...', बीडच्या सभेत शरद पवार कडाडले

याचाच परिणाम म्हणून देशात महागाई कमी होऊ शकते. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com