Sanjay Raut Twitter Post Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: संजय राऊत यांची ती एक पोस्ट; भाजपने मामा आणि बागुल यांच्या प्रवेशाला लावला ब्रेक

Sanjay Raut On BJP: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका पोस्टमुळे नाशिकमधील दोन दिग्गज नेत्याच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागला. आज मामा राजवाडे आणि सुनील बागुल भाजपमध्ये प्रवेश करणार होते.

Priya More

नाशिकमधील राजकारण चांगलेच चर्चेत आले आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे हे ठाकरे गटाचे नाशिकमधील प्रमुख नेते भाजपने आपल्या गळाला लावले. या दोन्ही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि ते आज माजी नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार होता. पण संजय राऊतांच्या एका ट्वीटमुळे संपूर्ण गेम पालटला. संजय राऊतांच्या ट्वीटनंतर भाजपने मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्या आज होणाऱ्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लावला.

संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली होती. या पोस्टनंतर सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागला. सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर नाशिकमधये गंभीर गुन्हा दाखल आहे. संजय राऊत यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे. नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले.'

त्यांनी या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की, 'क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार (भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे. सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही!' ही पोस्ट करत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी या पोस्टमध्ये पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

शिवसेना ठाकरे गटाने मामा राजवाडे यांची महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी केली. संजय राऊत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. राजवाडे यांच्यावर आठ दिवसांपूर्वीच महानगर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा आज भाजपात प्रवेश होणार होता. पण भाजपावर टीका होऊ लागल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लागला. आज मुंबईत भाजपच्या पक्ष कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार होता. मामा राजवाडे यांची हकालपट्टी केल्यानंतर प्रथमेश गीते यांची महानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. एकाच आठवड्यात दोनदा महानगरप्रमुख बदलण्याची वेळ शिवसेना ठाकरे गटावर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT