Maharashtra Politics: भाजप प्रवेश अचानक घडला नाही, यामागे मोठा इतिहास; कुणाल पाटील यांनी सगळंच सांगितलं|VIDEO

Khandesh Development Issues Raised: कुणाल पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश अचानक नसून त्यामागे इतिहास असल्याचं ते म्हणाले. खानदेशच्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली.

कॉँग्रेसनेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तिय माजी आमदार कुणाल पाटील यांनी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये काल पक्षप्रवेश केला.

याच विषयावर बातचीत करण्यासाठी कुणाल पाटील यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमाला मुलाखत दिली. धुळे जिल्हयातील एक कॉँग्रेसचा महत्वपूर्ण चेहरा तसेच त्यांच्या तीन पिढ्या या कॉँग्रेसमध्ये होत्या. मात्र असे अचानक काय झाले की कुणाल पाटील यांना भाजपचा झेंडा हाती घ्यावा लागला. हाच प्रश्न त्यानं विचारला असता ते म्हणाले, पक्षप्रवेश हा काही अचानक घडला नाहीये. यामागे मोठा इतिहास आहे.

गेल्या तीन पिढ्यांपासून आम्ही कॉँग्रेसमध्ये होतो. आमचे आजोबा आणि वडिलांच्या नावाने अनेक प्रकल्प, धरण आज ही खानदेशात आहे. कॉँग्रेसने देशाला आणि महाराष्ट्राला घडवायचे काम केले आहे. परंतु ज्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे होता. तो झाला नाही आणि खानदेशला कधीही मुख्यमंत्री मिळाले नाही अशी खंतही कुणाल पाटील यांनी बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com