kolhapur police arrests poultry owner for hitting minor childrens  Saam Digital
महाराष्ट्र

Saam Tv च्या बातमीची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल, अल्पवयीन मुलांना बेदम मारहाणप्रकरणी पोल्ट्री चालक अटकेत

Saam Impact News : हात-पाय बांधून मुलांना पोल्ट्री चालक दमदाटी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला हाेता. सहायक पोलिस निरीक्षक ए. बी. गाढवे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

कोल्हापूर जिल्ह्यातील हडलगे गावातील तीन लहान मुलांना बांधून मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली हाेती. या घटनेचे वृत्त साम टीव्हीने प्रसारित केले हाेते. साम टीव्हीच्या वृत्ताची दखल राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने घेतली. संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाईचा अहवाल देणाच्या सूचना आयाेगाने केल्याची माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

पोल्ट्रीतील पाण्याच्या टाकीत पाईप क्लिनिंगचे केमिकल टाकून आणि पोल्ट्रीमध्ये पाणी सांडून नुकसान केल्याच्या कारणावरून 12 ते 13 वयोगटातील तीन अल्पवयीन मुलांचे हातपाय दोरीने बांधून त्यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती.

दरम्यान या प्रकरणी गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे येथील विजय सुभाष कुंभार याच्याविरुद्ध नेसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी विजय सुभाष कुंभार यास अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

SCROLL FOR NEXT