Mumbai Goa Highway Landslide: मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणार आहात? काळजी घ्या (व्हिडिओ पाहा)

precaution to be taken at mumbai goa highway on landslide incident: प्रशासन आणि बांधकाम ठेकेदाराचे या धोकादायक स्थितीकडे दुर्लक्ष होत आहे असा आराेप स्थानिक नागरिक करु लागले आहेत.
precaution to be taken at mumbai goa highway on landslide incident
precaution to be taken at mumbai goa highway on landslide incident Saam Digital

- सचिन कदम / अमाेल कलये

दक्षिण रायगड मध्ये महाड पोलादपूर दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर दरडी काेसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातील टोळ, दासगाव, वहूर, केंबुर्ली, नडगाव आणि पोलादपुर तालुक्यातील चोळई, धामणदेवी गावा दरम्यान रस्त्या लगतचे डोंगर भाग धोकादायक बनले आहेत.

मुंबई गाेवा महामार्गाचे काम करत असताना कटींग केलेल्या डोंगर भागत छोट्या मोठ्या दगडी, उंच झाड धोकादायक स्थितीत आजही आहेत. अतिवृष्टी दरम्यान या भागात दरडीचा धोका संभवण्याची भिती निर्माण झाली आहे.

precaution to be taken at mumbai goa highway on landslide incident
Success Story: दिव्यांग 'माला' एमपीएससीत चमकली, शंकरबाबांच्या लेकीवर काैतुकाचा वर्षाव

धामणीत रस्त्याची डागडुजी सुरु

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील धामणी इथं संरक्षक भिंती जवळील खचलेल्या रस्त्याची डागडुजी सुरू करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गाला पर्याय नसल्याने रस्ता आणखीन खचल्यास वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात हाेती. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रस्ता खचू नये म्हणून तातडीने उपायोजना राबविण्यास प्रारंभ झाला आहे. खचत असलेल्या रस्त्याच्या ठिकाणी पावसाळ्यात लक्ष ठेवले जाणार आहे. सुमारे 250 मीटर खचलेल्या भागाच्या ठिकाणी बॉर्डर टाकण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

precaution to be taken at mumbai goa highway on landslide incident
डाॅक्टरच्या अटकेसाठी आयएमए संघटना सरसावली, पाेलिस ठाण्यात ठिय्या आंदाेलन; नेमकं काय घडलं सांगाेल्यात?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com