औकात नसणाऱ्यांना पक्षानं मोठं केलं, गद्दारांना साेडणार नाही; भाजपच्या माजी खासदारांनी सांगितलं पराभवाचे कारण (पाहा व्हिडिओ)

pratap patil chikhalikar tells reason of his defeat in nanded lok sabha election: नाव न घेता दिलेल्या इशाऱ्यानंतर चिखलीकरांचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा सध्या नांदेडमध्ये जोरात रंगल्याचं दिसून येतंय.
pratap patil chikhalikar tells reason of his defeat in nanded lok sabha election
pratap patil chikhalikar tells reason of his defeat in nanded lok sabha electionSaam Digital
Published On

- संजय सूर्यवंशी

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना आपण सोडणार नाही असा इशारा माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नुकताच नांदेड येेथे व्यक्त केला. चिखलीकर यांनी औकात नसणाऱ्यांना पक्षाने मोठं केलं असेही म्हटल्याने चिखलीकरांचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळासह नांदेड शहरात रंगली आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा दारुण पराभव झाला. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण हे विजयी झाले. चव्हाण यांच्याकडून झालेल्या पराभव हा चिखलीकर यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसतेय.

pratap patil chikhalikar tells reason of his defeat in nanded lok sabha election
Yavatmal : ढाणकीत भटक्या कुत्र्यांची दहशत,17 जणांचा घेतला चावा

काॅंग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला. त्यानंतर आपला विजय हा निश्चित आहे असे प्रताप पाटील चिखलिकार यांना वाटत हाेते. परंतु अशोक चव्हाण यांच्या सोबत आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना वाटलं जुने कार्यकर्ते काम करतील आणि भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांना वाटलं पक्षात आलेले नवीन कार्यकर्ते काम करतील. नेमका तेथेच घाेळ झाला.

या गैरसमजातून नांदेड शहरात कमी मतदान झालं आणि आपला पराभव झाला असं खूद्द भाजपचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी नमूद केले. औकात नसणाऱ्यांना पक्षाने मोठं केलं. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली असं सांगत त्यांना सोडणार नसल्याचा इशाराही चिखलीकरांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

pratap patil chikhalikar tells reason of his defeat in nanded lok sabha election
Success Story: किन्हाळा तांड्यात दिवाळी साजरी, दिव्यांग लक्ष्मी राठोडची एमपीएससीत बाजी; ग्रामस्थांनी वाजतगाजत काढली मिरवणूक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com