Dharashiv: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी युवकास जन्मठेप

youth gets life term for molesting minor child : विशेष म्हणजे आराेपीचे लग्न झालेले असून त्याचा पिडीतेच्या वयाच्या मुली असतानाही त्याने दुष्कर्म केलेले आहे असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
youth gets life term for molesting minor child
youth gets life term for molesting minor childSaam Digital

- बालाजी सुरवसे

अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकणी धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने रामेश्वर शिवाजी माने यास दाेषी ठरविले. त्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

6 ऑक्टोबर 2019 रोजी गतिमंद अल्पवयीन मुलीवर रामेश्वर माने याने लैंगिक अत्याचार केला. मुलीने आईला हा प्रकार सांगितल्यानंतर तिने पाेलिस ठाण्यात धाव घेतली. आईच्या तक्रारीनूसार धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

youth gets life term for molesting minor child
पाण्याचे दुर्भिक्ष! उपक्रमशील शेतीतून मिळविले भरघोस उत्पन्न; वाचा नांदेड, परभणीच्या शेतक-यांची Success Story

सरकार पक्षातर्फ आराेपी विराेधात 10 साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष व युक्तीवाद ग्राह्य धरुन बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपीला दोषी ठरवले. याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ज्या कलमाअंतर्गत आराेपीला दाेषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्यातील तरतुदीनूसार आराेपीस त्याचे उर्वरीत नैसर्गिक आयुष्य हे कारागृहात काढावयाचे आहे.

Edited By : Siddharth Latkar

youth gets life term for molesting minor child
औकात नसणाऱ्यांना पक्षानं मोठं केलं, गद्दारांना साेडणार नाही; भाजपच्या माजी खासदारांनी सांगितलं पराभवाचे कारण (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com