Members of Andhashraddha Nirmoolan Samiti and police officials conduct an awareness program in Mahadikwadi village, Raigad, to dispel fears of superstition and black magic. Saam Tv
महाराष्ट्र

अफवांचा खेळ संपला, महाडिकवाडीतील भीतीचं भूत उतरलं, पोलीस-अंनिसने केला सत्याचा उलगडा

Police And Andhashraddha Nirmoolan Samiti: रायगड जिल्ह्यातील महाडिकवाडी गावात भूत, करणी आणि जादूटोण्याबाबत पसरलेली भीती पोलीस आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जनजागृती कार्यक्रमामुळे पूर्णपणे दूर झाली.

Omkar Sonawane

अमित गवळे, सकाळ वृत्तसेवा

पाली: पेण शहराजवळील महाडिकवाडी गावात काही दिवसांपासून भूत, करणी, जादूटोणा होत असल्याची अफवा पसरवून गावात भीतीचे वातावरण निर्माण केले जात होते. यासंदर्भात पोलीस व महा. अंनिसने गावातील लोकांचे प्रबोधन व जनजागृती करून याबाबतची भीती घालवली.

गावात जिवंत कोंबडा जमिनीत पुरणे, स्मशानभूमीत नारळ फोडणे, घरात मोठ्या आवाजात मंत्र-तंत्र करून दहशत पसरवणे अशा घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती. याबाबत ग्रामस्थांनी पेण पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (म.अंनिस), पेण यांच्याकडे तक्रार केली होती.

महा. अंनिस ने या प्रकरणाची ग्रामस्थांबरोबर शहानिशा करून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नालकुल यांच्याशीही सविस्तर चर्चा केली व ज्यांच्यावर आरोप होते त्या कुटुंबाची भेट घेतली.सर्व बाबींचा विचार करून गावात भूत, भानामती, करणी, जादूटोणा याबाबत चमत्कारा मागील विज्ञान या विषयी प्रात्यक्षिके व प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी (ता. 17) सायंकाळी महाडिकवाडी येथे त्यानुसार व्याख्यान घेण्यात आले.

या व्याख्यानाचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, अशा प्रकारे करणी-जादूटोणा होत नसल्याची वैज्ञानिक व तर्कशुद्ध माहिती मिळाल्याने ग्रामस्थांच्या मनातील भीती पूर्णपणे दूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस सब इन्स्पेक्टर श्री. रसाळ, महा.अंनिसकडून नितीन निकम, प्राचार्य सतीश पोरे, जगदीश डंगर व संदेश गायकवाड उपस्थित होते. यावेळी महा.अंनिसचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

अशा पद्धतीत मंत्र तंत्र करून, कोंबडं पुरून वा नारळ फोडून कोणावरही जादूटोणा वा करणी करता येत नाही. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. अशा पद्धतीने कोणी दहशत पसरवीत असल्यास महा. अंनिस सोबत संपर्क साधावा. त्या मांत्रिक, बाबा, भगत वा महाराजाचा योग्य तो कायदेशीर पद्धतीने बंदोबस्त केला जाईल. असे आवाहन रायगडचे महा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष संदेश गायकवाड यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: फसव्या महिलांना कसे ओळखावे? आचार्य चाणक्यांनी सांगितले 7 महत्त्वाचे मार्ग

लग्नात आकर्षक लूक हवा? पाहा पैठणी साडीचे ८ युनिक डिजाईन्स; जाणून घ्या किंमत

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर मतदारांची उसळली मोठी गर्दी

भाजप आमदारानं भररस्त्यातच रिक्षाचालकाला कानफटवलं, VIDEO

SCROLL FOR NEXT