Manikrao Kokate Arrest Update: माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रूग्णालयात, पण...

Manikrao Kokate arrest update today : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात तैनात आहेत. अँजिओग्राफी अहवालानंतरच पुढील कायदेशीर कारवाईचा निर्णय होणार आहे.
Minister Manikrao Kokate
Minister Manikrao KokateSaam TV marathi News
Published On

Manikrao Kokate angiography report : माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलीस मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. उपचारासाठी दाखल असलेल्या कोकाटेंना डिस्चार्ज मिळताच अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या कोकाटेंवर वैद्यकीय उपचार सुरू असून लीलावती रुग्णालयात त्यांची अँजिओग्राफी चाचणी होणार आहे. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन पोलिसांकडून सतर्कता ठेवण्यात आली असून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी करण्यात आली आहे.

माणिकराव कोकाटे यांची सकाळी १० वाजेदरम्यान अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. अँजिओग्राफीच्या अहवालानंतरच नाशिक पोलीस पुढील कारवाईचा निर्णय घेणार असल्याचे समजतेय. पण दुसरीकडे कोकाटेंनी अटकेपासून वाचण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज कोकाटेंच्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यामध्ये कोर्टाकडून काय निर्णय देण्यात येणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कोकाटेंना अभय मिळणार की कोर्टाकडून अटकेचा आदेश कायम ठेवला जाणार, यावर काही तासात शिक्कामोर्तब होईल.

Minister Manikrao Kokate
Jeffrey Epstein Photo : ६८ फोटो अन् चॅट्स रिलीज, बिल गेट्स महिलांसोबत दिसले, एपस्टीन फाईल आज सार्वजनिक होणार

सकाळी अँजिओग्राफी होणार, पोलीस रूग्णालयात -

माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचे वॉरंट निघालेले आहे. पण ते रूग्णालयात उपचार घेत आहेत. लीलावती रुग्णालयात आज सकाळी माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एंजिओग्राफी जाणार केली जाणार आहे. अँजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतरच डॉक्टर त्यांच्या पुढील उपचार किंवा डिस्चार्ज संदर्भात योग्य तो निर्णय देणार आहेत. अँजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रुग्णालयातून माणिकराव कोकाटे यांच्या अँजिओग्राफी मेडिकल रिपोर्ट बाबत माहिती मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नाशिक पोलिसातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Minister Manikrao Kokate
Sambhajinagar : संभाजीनगर हादरलं! १०५ समजून २०५ मध्ये गेली, तिघांनी सामूहिक बलात्कार केला अन्...

उच्च न्यायालयात आज काय होणार ?

अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी माणिकराव कोकाटे यांनी मुंबईतील उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टात न्यायाधीश आर एन लद्धा यांच्या कोर्टासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मात्र आज कोकाटे यांना अटकेपासून दिलासा मिळणार की नाही ? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय.

अनिकेत निकम यांनी कोकाटे यांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीची मागणी केली होती. पण कोर्टान तातडीच्या सुनावणीस नकार दिला होता. यावर आज निर्णय घेतला जाणार आहे. उच्च न्यायालयात आज कोकाटे प्रकऱणावर सुनावणी होईल. कोकाटेंना अभय मिळणार की पोलिस अटक करणार, हे येणार्‍या काही तासात स्पष्ट होईल.

Minister Manikrao Kokate
भाडं मागायला गेली, भाडेकरूंनी घरमालकिणीसोबत असं काही केलं की सगळेच हादरले, बेडरूममध्ये...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com