नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी कंबर कसली आहे. धुळ्यानंतर नाशिकमध्ये आयोजित भाषणात पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.
मी प्रभू श्री रामाला वंदन करतो. त्र्यंबकेश्वर आणि रेणुका देवीला नमन करतो. अयोध्येत प्रभू श्री रामाच्या मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले.
मला तुकाराम मंदिरात सफाई आणि सेवा करण्याची संधी मिळाली. आज पुन्हा नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय.
आज पुल देशपांडे यांची जयंती. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आज महाराष्ट्र विकास करतोय. आपला देश नवे रेकॉर्ड बनवतोय.
कारण आज देशात गरिबांची चिंता करणारे सरकार आहे
इतकी वर्ष काँग्रेसने देशात गरिबी हटावचा नारा दिला. मात्र तरी पण समाज गरीब रोटी कपडा मकान यासाठी उपेक्षित राहिला. मात्र दहा वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले.
हे शक्य झालं, कारण मोदी गरिबांचा सेवक म्हणून काम करतोय. गरिबांसाठी लढाई फक्त पंतप्रधान मोदींनी नाही तर जनतेने देखील केली
उज्वला गॅस योजनेतून मोफत गॅस देण्यात आला.
राज्यात महायुती सरकार पुन्हा येणे गरजेचे आहे. डबल इंजिन सरकारमध्ये विकासाची गती पण डबल आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी आणि शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे.
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना केली जाणारी या दोन योजना अंतर्गत 12,000 रुपयांची मदत ही 15,000 रुपये केली जाईल.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या देखील समजतो. कांदा निर्यातीत सवलतीसाठी पॉलिसीमध्ये बदल केले गेले.
महाराष्ट्र पुढे गेला, तरच देश पण पुढे जाईल, विकसित होईल. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महाराष्ट्र प्रगत होतोय.
एखाद्या सरकारने हे काम रोखलं तर काय होईल? महाराष्ट्राची प्रगती खुंटेल.
महाविकास आघाडी सरकारने अटल सेतूला विरोध केला, समृद्धी महामार्गाला विरोध केला.
अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने मोठा भ्रष्टाचार केलाय. महाविकास आघाडीला आता सत्तेपासून लांब ठेवायचा आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.