Maharashtra Assembly Election : भाजपचे स्टार प्रचारक ठरले, PM मोदी, नवतीन राणा, नारायण राणेंसह ४० जणांची तोफ धडाडणार!

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ४० स्टार प्रचारकाची यादी जाहीर केली आहे.
Maharashtra Assembly Election 2024
रावसाहेब दानवे SaamTvNews
Published On

Maharashtra Assembly elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात प्रचार करण्यासाठी भाजपकडून ४० स्टार प्रचारकांचा समावेश करण्यात आलाय. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांना स्थान देण्यात आलेय. भाजपचे बहुतांशी राज्यातील मुख्यमंत्री यांचा देखील स्टार प्रचारक यादीत समावेश करण्यात आला आहे. (BJP Releases List of Star Campaigners)

विधानसभा निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राज्यातील दिग्गजांचाही समावेश आहे. त्यामध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अशोक चव्हाण, आशिष शेलार, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यासह अनेक दिग्गज स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

स्टार प्रचारकाच्या यादीत कोण कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी

जेपी नड्डा

राजनाथ सिंह

अमित शाह

नितीन गडकरी

योगी आदित्यनाथ

प्रमोद सावंत

भुपेंद्र पटेल

विष्णू देव साई

मोहन यादव

भजनलाल शर्मा

नायम सिंह सैनी

हेमंत बिस्वा

शिवराज सिंह चौव्हाण

देवेंद्र फडणवीस

चंद्रशेखर बावनकुळे

शिव प्रकाश

भुपेंद्र यादव

अश्विनी वैष्णव

नारायण राणे

पियुष गोयल

ज्योतिरादित्य शिंदे

रावसाहेब दानवे

अशोक चव्हाण

उदयनराजे भोसले

विनोद तावडे

आशिष शेलार

पंकजा मुंडे

चंद्रकात पाटील

सुधीर मुनगंटीवार

राधाकृष्ण विखे पाटील

गिरीश महाजन

रवींद्र चव्हाण

स्मृती इराणी

प्रवीण दरेकर

अमर साबळे

मुरलीधर मोहोळ

अशोक नेते

संजय कुटे

नवनीत राणा

भाजपने राज्यात २५ हेलिकॉप्टर बूक केले -

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने राज्यात उपलब्ध सर्व २५ हेलिकॉप्टर बूक केली आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीने राजस्थान, दिल्ली, कर्नाटक आणि गुजरातहून हेलिकॉप्टर मागवल्याचे महाराष्ट्रातील अॅव्हिएशन कंपन्या सांगत आहेत. मागणी वाढल्याने लोकसभेच्या तुलनेत हेलिकॉप्टर सेवेच्या दरात १५ ते २०% वाढ झाली. आहे. जनरल सिव्हील एव्हिएशनच्या डिसेंबर २०२३ च्या आहवालानुसार देशात १९१ हेलिकॉप्टर आहेत. पैकी १९ विविध राज्यांच्या मालकीचे आहेत. महाराष्ट्रातील ७१ हेलिकॉप्टरपैकी ग्लोबल वेक्ट्रा एव्हिएशनचे ३० तर हॅलिगोचे १५ आहेत. या कंपन्या राज्य शासन, ओनएजीसीला सेवा पुरवतात. खासगी मालकी, कंपन्या आणि कॉर्पोरेट्स वगळता फार तर २४-२५ हेलिकॉप्टर प्रचाराला उरतात. भाजपने एखाचवेळी बुकिंग केल्यामुळे मविआने राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीहून प्रत्येकी २ तर चंगलुरूजून ४ हेलिकॉप्टर महिनाभरासाठी बुक केल्याची माहिती मुंबईतील एका कंपनीने दिली.

भाजपची आज दुसरी यादी येणार -

महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत भाजपने ९९ जणांच्या नावाची घोषणा केली होती. आज दुसरी यादी येणार आहे. यामध्ये मुंबईतील वादग्रस्त जागांबाबत आज निर्णय असू शकतो. शुक्रवारी रात्री या संदर्भात उशिरापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजपची बैठक पार पडली. काही जागा शिवसेनेला देण्याबाबत चर्चा तर काही ठिकाणी उमेदवार अदलाबदलीचीही शक्यता आहे. वरळी, शिवडी, अंधेरी पूर्व या जागांवर सेनेचा दावा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com