PM Kisan Yojana Saam tv
महाराष्ट्र

PM Kisan Yojana : महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकर्‍यांना गुड न्यूज, तब्बल ₹१,८३७ कोटी जमा; तुमच्या खात्यात पैसे आले का?

Maharashtra Farmer PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान योजनेचा २२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. देशातील ९.३२ कोटी शेतकऱ्यांना १८,६४५ कोटी रुपयांची मदत मिळाली असून महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १,८३७ कोटींचा लाभ मिळाला आहे.

Alisha Khedekar

  • पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

  • देशातील ९.३२ कोटी शेतकऱ्यांना १८,६४५ कोटी रुपयांचे वितरण

  • महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १,८३७ कोटी रुपयांची मदत

  • डीबीटी पद्धतीने थेट बँक खात्यात रक्कम जमा

  • शेतकऱ्यांच्या शेती खर्चासाठी आर्थिक दिलासा

पंतप्रधान किसान योजनेचा २२ हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात काल जमा करण्यात आला आहे. एकूण ९.३२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,६४५,१८२,६०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटींचे वितरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात २०२५ मध्ये तुफान पावसाने बॅटिंग केली. या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. मात्र आता शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान योजने मार्फत राज्यातील सुमारे ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १,८३७ कोटींची रक्कम थेट जमा झाले आहेत. या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे तसेच इतर शेतीच्या आवश्यक खर्चांसाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होईल. शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

थेट लाभ हस्तांतरणाच्या ई- वितरण पद्धतीमुळे (डीबीटी) माध्यमातून ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कार्यालयातून दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी झाले होते. विधानभवन समिती कक्षातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव लेखा व कोषागारे रिचा बागला दूरदृश्य प्रणाली द्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४.२७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे. दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबांना ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. या २२ व्या हप्त्यात २.१५ कोटीहून अधिक महिला शेतकरी लाभार्थ्यांनाही आर्थिक मदत मिळाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold smuggling : प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून आणलं ५ कोटींचं सोनं; विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी उघड, ५ जणांना अटक

इकडे इराण-अमेरिका युद्धाला ब्रेक, तिकडे किम जोंगने मिसाइल डागले, कोरियात खळबळ

Maharashtra News Live Update: ठाण्यातून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक खोळंबली

Marathi Natak: प्रियदर्शन जाधव आणि विशाखा सुभेदारची जोडी पुन्हा कल्ला करणार; शांतेचं कार्टं चालू आहे पुन्हा रंगभूमीवर अवतरणार

संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT