पिंपरी चिंचवड : पिंपरी- चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळालेल्या (Pimpri chinchwad) माहितीवरून स्पा सेंटरमध्ये चालणारा वेश्या व्यवसाय उध्वस्त केला आहे. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. (police) तर या प्रकरणी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गेरा इंपिरियम राईस या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर ब्रिथ स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविण्यात येत होता. भरवस्तीत चालविणाऱ्या या वेश्या व्यवसायाबाबतची गोपनीय माहिती (Pimpri Chinchwad Police) पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (Crime News) मिळाली होती. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक धाड टाकली. यावेळी येथे गैरप्रकार सुरु असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दोघे ताब्यात
पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्पा सेंटरचा मॅनेजर पवन बाळासाहेब वनवे तसेच स्पा सेंटरचा मालक दीपक ज्योतिराम कोल्हापूरकर या दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्पा सेंटरमध्ये देह विक्री करणाऱ्या तीन पीडित मुलींची सुटका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.