Student Scholarship : ४ हजार १८६ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज पडून; समाज कल्याण विभागाची महाविद्यालयांना तंबी

Sambhajinagar News : बेजबाबदारपणामुळे तब्बल ४ हजार १८६ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांच्या लॉगिंवर पडून असल्याचे धक्कादायक चित्र संभाजीनगर जिल्ह्यात पाहण्यास मिळाले
Student Scholarship
Student ScholarshipSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात असतो. याकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले जातात. मात्र महाविद्यालयाच्या बेजबाबदारपणामुळे तब्बल ४ हजार १८६ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांच्या लॉगिंवर पडून असल्याचे धक्कादायक चित्र (Sambhajinagar) संभाजीनगर जिल्ह्यात पाहण्यास मिळाले. (Maharashtra News)

Student Scholarship
maval News : विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर शिष्यवृत्तीचा (Scholarship) लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असते. अशा सद्यस्थितीत विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाईन अर्ज पैकी २० हजार ८७४ अर्ज महाविद्यालयाकडून समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड झाले आहे. मात्र, अजूनही ४ हजार १८६ विद्यार्थ्यांचे (Student) शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयाच्या लॉगिनवर पडून असल्याने हे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Student Scholarship
Muktainagar Crime : अनैतिक संबंधातून महिलेचा खून; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

दरम्यान मागील काही दिवसांपासून महाविद्यालयांच्या बेजबाबदारपणामुळे जवळपास ४ हजार १८६ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांच्याच लॉगिनवर पडून असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जर हे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिले, तर  त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील; अशी तंबी आता समाज कल्याण विभागाने महाविद्यालयांना दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com