maval News : विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Maval News : दुपारच्यावेळी तो गावाजवळ असलेल्या एका विहिरीत पोहन्यासाठी गेला होता. ज्या विहिरीत उतरला त्या विहिरीला कपारी होत्या. युवक पोहत असताना विहिरीला असलेल्या कपारी गेला,
maval News
maval NewsSaam tv

मावळ : नातेवाईकाकडे आलेला एक तरुण दुपारच्यावेळी विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाला. (Maval) सदरची घटना मावळच्या टाकावे बुद्रुक गावाजवळ घडली. चार तासांनंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. (Live Marathi News)

maval News
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त २८५ कर्मचाऱ्यांची ट्रेनिंगला दांडी; गैरहजर कर्मचाऱ्यांना बजावणार नोटिस

संजय महेंद्र चौहान असे मृत्यू (death) झालेल्या तरुणाचे नाव आहे. संजय हा टाकावे बुद्रुक येथे आपल्या नातेवाईकांकडे उत्तर प्रदेशामधून (Uttar Pradesh) आला होता. दुपारच्यावेळी तो गावाजवळ असलेल्या एका विहिरीत पोहन्यासाठी गेला होता. ज्या विहिरीत उतरला त्या विहिरीला कपारी होत्या. युवक पोहत असताना विहिरीला असलेल्या कपारी गेला, यात तो अडकेल्याने तेथून त्याला निघता आले नाही. यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

maval News
Ahmednagar News : स्मशानभूमीला जाण्यास रस्ता नाही तर आता मतदान नाही; वाघवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

दरम्यान घटनेची माहिती (Lonavala Police) लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाचा शोध घेण्यासाठी शिवदुर्ग टीमला पाचारण करण्यात आले. विहिरीत उतरून तरुणाचा शोध सुरु केल्यानंतर चार तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com