Parbhani Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Bribe Case : पोलीस उपनिरिक्षकासह एकास लाच घेताना पकडले; वाळूचा ट्रक सोडवण्यासाठी १ लाखाची केली होती मागणी

Parbhani News :न्यायालयात ट्रक सोडविण्यासाठीचा अहवाल सादर करण्यासाठी पोउपनि जंत्रे यांनी खाजगी इसमाकडे तडजोडीअंती ७० हजार रूपये देण्यास सांगीतले.

राजेश काटकर

परभणी : मानवत पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उपनिरिक्षकासह एकास लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मानवत पोलीस स्टेशन हद्दीत परभणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केली. पोलिसांनी जप्त केलेला वाळूचा ट्रक सोडविण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. 

परभणीच्या (Parbhani) मानवत पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोउपनि गजानन रामभाऊ जंत्रे व मानवत येथील खाजगी नोकरदार मंतशिर खान कबीर खान पठाण उर्फ बब्बुभाई यांनी तक्रारदाराकडून रेतीचे जप्त केलेले ट्रक सोडवण्याकरीता १ लाख रूपयांची लाच (Bribe) मागितली होती. न्यायालयात ट्रक सोडविण्यासाठीचा अहवाल सादर करण्यासाठी पोउपनि जंत्रे यांनी खाजगी इसमाकडे तडजोडीअंती ७० हजार रूपये देण्यास सांगीतले. त्यापैकी ५० हजार रूपये न्यायालयाच्या निकालाच्या आधी व २० हजार रूपये निकालानंतर देण्याचे ठरले. 

सदर बाब तक्रारदाराने (ACB) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार दिली. या नंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली. त्या सापळ्यात खाजगी इसम ५० हजार रूपये स्विकारून पळून गेला. त्यानंतर मानवत शहरात लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने मोठ्या शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतले. मानवत (Police) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया करण्यात आली. या कारवाईसाठी नांदेड परीक्षेत्राचे एसीबीचे पोलिस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी एसीबीचे पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर यांनी सापळा रचत कारवाई करून पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धुरंधर फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, लग्नाआधीच कपलला आहेत २ मुलं

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी करताना चूक झाली, आता काय कराल? लाडक्या बहि‍णींसाठी सरकारची मोठी घोषणा

Urad Dal Recipe: नाश्त्याला बनवा उडीदाच्या डाळीचे खमंग, खुसखुशीत वडे, सर्वजण आवडीने खातील

Kitchen Hacks: गॅसवर ठेवताच दूध पटकन फाटते? गरम करताना ही गोष्ट लक्षात ठेवाच

SCROLL FOR NEXT