Wrecked car after a fatal double collision near Manwat in Parbhani district where two brothers lost their lives. saam tv
महाराष्ट्र

नियंत्रण सुटलेल्या कारची दुहेरी धडक; आधी पुलाच्या कठड्याला, नंतर टेम्पोवर आदळून दोन भावांचा मृत्यू

Parbhani Manwat Road Fatal Accident Details: परभणी-मानवत रोडवर भीषण अपघातात कारवरील नियंत्रण सुटल्याने दुहेरी धडक झाली. या अपघातात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला असून आयशर चालक जखमी झाला आहे.

Omkar Sonawane

परभणी जिल्ह्यातील मानवतजवळ परभणी-पाथरी रोडवर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून आयशर वाहनाचा चालक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील गणेश तानाजी निर्मळ आणि माऊली वैजनाथ निर्मळ हे दोघे प्रवास करत होते. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार प्रथम उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकली. त्यानंतर कार समोरून येणाऱ्या आयशर वाहनावर जाऊन जोरदार आदळली.

अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील दोघांना बाहेर काढले. मात्र, त्यावेळी दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या भीषण अपघातात आयशर चालक जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रायगडमध्ये एसटीला अपघात; सातही प्रवासी सुखरूप

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात बोर्ली तालुक्यात पंचतन परिसरात आज एसटी बसला अपघात झाल्याची घटना घडली. कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक घेतल्याने बसचा ताबा सुटला आणि एसटी थेट रस्त्याच्या कडेला घसरली.

ही बस बोर्ली पचतनवरून कार्ले खुजारे गावाकडे जात होती. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.एसटीमधील सातही प्रवासी पूर्णपणे सुखरूप असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, स्थानिकांच्या मदतीने आणि तात्काळ प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Timing: मोठी बातमी! शाळाच्या वेळेत बदल; पुणे महापालिकेनं का घेतला निर्णय?

Loose Motion Remedies : पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाल्ल्याने जुलाब होतायेत? 'हा' घरगुती उपाय मिनिटांत देईल आराम

Maharashtra News Live Update: परळीत मुसळधार पावसाचे आगमन तर पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा

Rain Alert : पावसाची तुफान बॅटिंग; कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय? VIDEO

Health Care: पावसाळ्यात ही ५ फळे खा; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास होईल मदत

SCROLL FOR NEXT