EPFO चा मोठा निर्णय! २ जुलैपर्यंत PF क्लेम आणि पासबुक डाउनलोड पूर्णपणे बंद, वाचा संपूर्ण माहिती

PF Claim News: कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. २ जुलैपर्यंत ईपीएफओच्या काही सेवा बंद राहणार आहेत. तसेच अनेक बदल झालेले आहेत.
Employees Provident Fund
Employees Provident Fundgoogle
Published On

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) च्या सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. EPFO च्या ऑनलाइन सेवा आणखी एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पीएफ क्लेम दाखल करणं, पासबुक डाउनलोड करणं, क्लेमची स्थिती तपासणं आणि इतर अनेक ऑनलाइन सुविधा सध्या उपलब्ध होणार नाहीत. EPFO ने पोर्टलवर जारी केलेल्या ताज्या सुचनेनुसार १ जुलै २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत या सेवा बंद राहतील. त्यानंतर २ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून सेवा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

ईपीएफओने याआधी या सेवा २९ जूनपासून सुरू होतील, अशी माहिती दिली होती. त्यानंतर पुन्हा मुदत वाढवून १ जुलैपासून सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण आता आणखी एक दिवस मुदत वाढवण्यात आल्यामुळे सेवा २ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षातला हा EPFO चा सर्वात मोठ्या नियोजित देखभाल मोहिमांपैकी एक मानला जात आहे. याचा परिणाम लाखो कर्मचारी, पेन्शनधारक आणि पीएफ संबंधित कामांसाठी ऑनलाइन सुविधांवर अवलंबून असलेल्या संस्थांवर झाला आहे.

Employees Provident Fund
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू; यादी कधी आणि कुठे पाहाल?

तसेच या कालावधीत सदस्यांना मेंबर पोर्टल किंवा उमंग अॅपवर लॉगिन करता येणार नाही. त्यामुळे ऑनलाइन पीएफ क्लेम दाखल करणे, पासबुक डाउनलोड करणे, क्लेम स्टेटस तपासणे, पीएफ खातं ट्रान्सफरची विनंती करणे तसेच वैयक्तिक माहिती अपडेट करणे अशा सुविधा तात्पुरत्या बंद राहतील. Employers पोर्टलचा वापर करता येत नसल्याने नियमित प्रशासकीय आणि अनुपालनाषी संबंधित कामांवरही परिणाम झाला आहे.

EPFO च्या माहितीनुसार, डेटाबेस जास्त मजबूत करण्यासाठी आणि क्लेम प्रक्रिया जलद, सुरक्षित आणि विश्वासू बनवण्यासाठी प्रणालीचे आधुनिकीकरण केले जाते. यासाठी सॉफ्टवेअर आणि तांत्रिक यंत्रणेत महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत. या अपग्रेडमुळे भविष्यात सदस्यांना जास्त वेगवान आणि सुरक्षित ऑनलाइन सेवा मिळणार असल्याचे ईपीएफओने स्पष्ट केलं आहे.

Employees Provident Fund
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8वा वेतन आयोग लागू झाल्यास किती वाढेल पगार? फिटमेंट फॅक्टर, DA चा संपूर्ण हिशेब जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com