Pandharpur Wari Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Wari: विठुरायाच्या भेटीची ओढ! तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान; मार्ग कसा असणार? वाचा सविस्तर

Pandharpur Wari Sant Tukaram Maharaj Palkhi Route: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. यासाठी लाखो वारकरी दाखल झाले आहेत.

Siddhi Hande

"ज्ञानोबा माऊली... तुकाराम!" चा गजर करत, भक्तिरसात न्हालेली असंख्य दिंड्या आज आळंदीत इंद्रायणी घाटावर दाखल झाला आहेत. तश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांनी इंद्रायणी घाटावर एकत्र येत टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तीचा जल्लोष इंद्रायणी काठी सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामं उरकून आता मनोभावे वारीला हजेरी लावली आहे. 'आता विठ्ठल भेटीची ओढ” अशा भावना व्यक्त करत वारकरी संपूर्ण तनमनाने पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी सज्ज झालेत.

यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी शेतीची प्राथमिक कामं पूर्ण केली आहेत.यंदा वारकऱ्यांची संख्या दिडपट वाढणार असुन गर्दीचा संभाव्य वाढता प्रमाण लक्षात घेता, वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा, महिला सुरक्षेचे उपाय, स्वच्छता, पाणी, शौचालय आदी मुलभूत सोयीसुविधा तसेच कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पालखी प्रस्थानावेळी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आणि व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी, VVIP वा अन्य मान्यवरांनी प्रस्थानस्थळी येऊ नये, असे आवाहन आळंदी देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.

पालखी सोहळा 2025pdf.pdf
Preview

संत तुकाराम महाराज संस्थानाच्यावतीने पूर्ण तयारी झाली आहे. चांदीच्या रथाला उजाळा दिला आहे.तसेच कॅमेरेदेखील लावले आहे. मंदिराला आकर्षक फूलांची सजावट करण्यात आली आहे. दुपारी अडीच वाजता महाराजांच्या पादुकांचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर पालखीचे प्रस्थान होणार आहे. महारजांच्या पालखीच्या पुढे चालणारा मानाचा पेठ बाभुळगावकरांचा अश्व आज प्रस्थानावेळी उपस्थित आहे.

पालखीचा मार्ग कसा असणार आहे?

१८ जून- देहूतून पालखीचे प्रस्थान

१९ जून-आकुर्डी

२२ जून-लोनी कोळभोर

२६ जून-बारामती

२९ जून-इंदापूर

१जुलै- अकलूज

२ जुलै-बोरगाव श्रीपूर

५ जुलै- पंढरपूर

रिंगण सोहळा

बेलवाडी येथे पहिले गोल रिंगण होणार आहे. त्यानंतर इंदापूर येथे रिंगण होणार आहे. अकलूज येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे.

माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होणार आहे. यानंतर बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण होणार आहे. वाखरी येथे पादुका आरती आणि नंतर तिसरे उभे रिंगण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World War 3: जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? मस्क यांचा इशारा, जगाला टेन्शन

Riteish Deshmukh : "लवकरच येत आहोत..." रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, रिलीज डेट काय?

Ladki Bahin : "आम्हालाच मत द्या, नाहीतर 'लाडकी बहीण'चे ₹१५०० बंद करू, भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल"

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Heart Attack: विशी, तिशी आणि चाळिशीतच हार्ट अटॅकचा धोका; फक्त या ५ गोष्टी कराल तर मरणातून वाचाल!

SCROLL FOR NEXT