पंढरपूर : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासाठी खूप काही करता येथे. परंतु सोलापूरचे पालकमंत्री पद न मिळाल्याची खंत व्यक्त करत जर मी सोलापूरचा पालक मंत्री असतो; तर लोकांनी मला डोक्यावर घेतलं असतं. असा टोला क्रिडा मंत्री व वाशिमचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी सध्याचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लगावला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार बसल्यानंतर तिन्ही पक्षांना मंत्रीपद, खातेवाटप करताना मोठी कसरत झाली. यानंतर पालकमंत्री पद वाटपावरून देखील मोठा तिढा निर्माण झाला होता. दरम्यान सोलापूरच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किती चढाओढ होती हे आजही दिसून येत आहे. तशी खंत दत्ता भरणे यांच्या बोलण्यातून दिसून आली आहे. पंढरपुरात एका मठाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते. या दरम्यान सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विविध विकास कामांची मागणी दत्ता भरणे यांच्याकडे केली होती. त्यावर बोलताना दत्ता भरणे यांनी ही टोलेबाजी केली.
पालकमंत्री पद न मिळाल्याची खंत
मागील वेळी सोलापूरचे पालकमंत्री पद दत्ता भरणे यांच्याकडे होते. पुन्हा सोलापूरचे पालकमंत्री आपणाला मिळेल; अशी आशा भरणे यांना होती. मात्र भाजपने सोलापूरचे पालकमंत्री स्वतःकडे घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पालकमंत्री पद दिले. यावरून आता दत्ता भरणे यांनी सोलापूरचे पालकमंत्री पद न मिळाल्याची खंत व्यक्त केली.
कोणताही भेदभाव केला नाही
मी या सोलापूरचा पालकमंत्री असतो तर तुम्हाला मी बोलू सुध्दा दिले नसते. मागील वेळी पालकमंत्री असताना लोकांच्या मनात आजही आठवणी आहेत. मोहिते पाटील विरोधात असतानाही मी कोणताही भेद भाव केला नाही. लोकांची कामं केली. पालकमंत्र्यांना खूप काही करता येत. मी पालक मंत्री असतो तर लोकांनी मला डोक्यावर घेतलं असतं अस म्हणत भरणे यांनी गोरे यांना टोला लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.