Badlapur Politics : आपण कुणामुळे निवडून आलो हे लक्षात ठेवलं पाहिजे; आमदार किसन कथोरेंचा ज्ञानेश्वर म्हात्रेंना सल्ला

Badlapur News : कोकण शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याबद्दल काही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजपा कार्यकर्तेच नव्हे, तर आमदारही नाराज असल्याचं समोर आलंय
Badlapur Politics
Badlapur PoliticsSaam tv
Published On

मयुरेश कडव 
बदलापूर
: भाजपाच्या कोट्यातून कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार झालेले ज्ञानेश्वर म्हात्रे हे नक्की भाजपाचे आहेत? की शिवसेनेचे? हेच सध्या समजत नाही, अशी खदखद भाजपाचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी व्यक्त केली. तर आपण कुणामुळे निवडून आलो, हे त्यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे, असा सल्ला भाजपा आमदार किसन कथोरे यांनी आमदार म्हात्रेंना दिला आहे.

कोकण शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याबद्दल काही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजपाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंवर बदलापूरचे भाजपा कार्यकर्तेच नव्हे, तर आमदारही नाराज असल्याचं समोर आलंय. यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून यावर निशाणा साधला जात असून म्हात्रे हे भाजपमुळे निवडून आल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

Badlapur Politics
Pakistan: 'मला गोळ्या घाला पण..' भारत सोडताना पाकिस्तानी लोकांना अश्रू अनावर; ६२७ जण मायदेशी परतले

राजन घोरपडेंनी व्यक्त केली खदखद 

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपाची उमेदवारी देण्यात आली होती. या नंतर त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. मात्र म्हात्रे यांनी आजवर भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला निधी दिलेला नाही. उलट जिथे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, अशा प्रभागांमध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच निधी दिला आहे, अशी जाहीर खदखद भाजपाचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी व्यक्त केली. याबाबत आपण वरिष्ठांकडे सुद्धा ही खदखद मांडणार असल्याचं राजन घोरपडे म्हणाले.

Badlapur Politics
Hingoli : व्यापाऱ्यांकडून मापात पाप; १४ किलो हळदीतील ४ किलोचा झोल करत शेतकऱ्यांची फसवणूक

स्थानिक राजकारणात ओढण्याचा प्रयत्न 

आपण कुणामुळे निवडून आलोय, हे त्यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे, असं म्हणत ज्ञानेश्वर म्हात्रे भाजपामुळेच निवडून आले आहेत, असं आमदार किसन कथोरे म्हणाले. दरम्यान याबाबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विचारलं असता, मला सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते भेटायला येतात आणि मी सगळ्यांना भेटतो. मात्र तरीही मला स्थानिक राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला जात असून आपण याबाबत वरिष्ठांशी चर्चा करू; असं म्हात्रे यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com