Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Milk Price: दुग्धविकास मंत्र्यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; दूध दर वाढीसाठी पंढरपुरात आंदोलन

Pandharpur News : अन्यथा दिवाळी पाडव्याच्या दिवशी दुग्धमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर खर्डा भाकरी आंदोलन केले जाईल

भारत नागने

पंढरपूर : गाय व म्हशीच्या दुधाला दर मिळत नसल्याने दूध दर वाढ व्हावी अशी मागणी होत आहे. दुध (Pandharpur) दरवाढीच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. दुध खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन करण्यात आले. (Maharashtra News)

सध्या दूध खरेदीदाराकडून दुघ खरेदी करताना चांगला दर दिला जात नाही. यात गाईच्या दूधाला ४० रूपये तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ८० रूपये दर मिळावा; अशी मागणी होत आहे. याच मागणीसाठी आज पंढरपूर- विजयपूर मार्गावर अनवली गावात रयत क्रांती संघटनेच्यावतीने (Milk Price) रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रटळऊस दुग्धाभिषेक करत घोषणाबाजी करण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अन्यथा दिवाळीच्या दिवशी खर्डा भाकरी आंदोलन 

खासगी दूध संघांनी दूध दरात कपात केली आहे. दिवाळी पूर्वी सरकारने दुध दरात वाढ करावी अन्यथा दिवाळी पाडव्याच्या दिवशी दुग्धमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर खर्डा भाकरी आंदोलन केले जाईल; असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT