Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील १५ नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, असा असेल संपूर्ण दौरा

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी १५ नोव्हेंबर पासून पुन्हा दौरा सुरू करणार आहेत.
Manoj Jarange Patil On Maratha Reservation
Manoj Jarange Patil On Maratha ReservationSaam Digital
Published On

Maratha Reservation

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांच्या भेटीगाठी घेण्यासाठी पुन्हा दौरा सुरू करणार आहेत. दिवाळीनंतर १५ नोव्हेंबरपासून कोल्हापूर येथून छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून दौऱ्याला सुरुवात होणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान उद्योगपती, डॉक्टर, शिक्षक यांनी कोणीही मराठा समाजाला पैसे देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. १५ ते २३ नोव्हेंबर असा दौरा राहणार असून अंतरवाली येथे दौरा संपणार आहे.

असा असेल दौरा

- 15 नोव्हेंबर

वेळ सकाळी 11.00 अंतरवाली ते वाशी, दुपारी 4:30 वाशी ते पारांडा, रात्री 7:30 परंडा ते करमाळा

१६- नोव्हेंबर

सकाळी 11.00 वाजता करमाळा ते दौंड, दुपारी 5.00 दौंड ते मायणी

17 नोव्हेंबर

सकाळी 10.00 मायणी ते सांगली, दुपारी 2.00 सांगली ते कोल्हापूर, दुपारी 5.00कोल्हापूर ते इस्लामपूर, रात्री 8.00 इस्लामपूर ते कराड

18 नोव्हेंबर.

सकाळी 10.00 कराड ते सातारा, दुपारी 1.00 सातारा ते मेढा, दुपारी 4.00 मेढा ते वाई, रात्री 9.00 वाई ते रायगड

19 नोव्हेंबर

सकाळी 9 ते 1 रायगड दर्शन - पाचाड ते रायगड, दुपारी 3.00 महाड दर्शन, रात्री 7 वा. रायगड - मुळशी - आळंदी

20 नोव्हेंबर

सकाळी 9 वा. आळंदी ते तुळापूर - छत्रपती संभाजीराजे अभिवादन, सकाळी 11.00 वा. तुळापूर ते पुणे (खराडी , चंदननगर), दुपारी 3.00 वा. पुणे ते खालापूर, सायंकाळी 6.00 वा. खालापूर ते कल्याण

21 नोव्हेंबर

सकाळी 10 कल्याण ते ठाणे, दुपारी 3.00 ठाणे ते पालघर, रात्री 8.00 पालघर ते त्र्यंबकेश्वर

22 नोव्हेंबर

सकाळी 11.00 त्रिंबकेशवर ते विश्रांतगड , दुपारी 3.00 विश्रांतगड ते संगमनेर, सायंकाळी 6.00 संगमनेर ते श्रीरामपूर

23 नोव्हेंबर

सकाळी 10.00 श्रीरामपुर ते नेवासा, दुपारी 1.00 नेवासा ते शेवगाव, दुपारी -5.00 शेवगाव ते बोधेगाव, धोंडराई, सायंकाळी 7.00 धोंडराई ते अंतरवाली सराटी

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil On Maratha Reservation
Hingoli News : 'मराठा समाजात जन्माला आलो हा माझा गुन्हा आहे का?', २७ वर्षीय तरुणाने आरक्षणासाठी जीवन संपवलं

मराठा समाजाचा लढा गोरगरीबांना न्याय देण्यासाठी आहे, पैसे कमवण्यासाठी नाही. महाराष्ट्रातील दौरे, सभा यांचा खर्च आम्ही कोणाकडे मागितलेला नाही. त्यामुळे कोणीही पैसे देऊ नये असं आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये जागृती करण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Manoj Jarange Patil On Maratha Reservation
Milk Price: दुग्धविकास मंत्र्यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; दूध दर वाढीसाठी पंढरपुरात आंदोलन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com