Vitthal Rukmini Mandir Saam tv
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Mandir : आषाढीनिमित्ताने विठ्ठरायाचे आता २४ तास दर्शन; २६ जुलैपर्यंत मंदिर राहणार खुले

Pandharpur News : विठुरायाच्या दर्शनासाठी वाट पाहणारे वारकरी, भाविक पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. दहा दिवसांवर आषाढी एकादशी असून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रंग लागू लागल्या आहे.

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक आतापासून गर्दी करू लागले आहेत. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे आषाढी यात्रेच्या निमित्ताने आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू करण्यात आले. पुढील साधारण २० दिवस मंदिर आता २४ तास खुले राहणार आहे. 

वर्षातून एकदा येणारे आषाढी वारीची (Ashadhi Wari) वारकरी मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी वाट पाहणारे वारकरी, भाविक पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. दहा दिवसांवर आषाढी एकादशी असून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रंग लागू लागल्या आहे. त्या दृष्टीने विठ्ठल मंदिर समितीचे नियोजन देखील झाले आहे. येणाऱ्या प्रत्येक विठ्ठल भक्ताला (Vitthal Rukmini Mandir) चांगले दर्शन घेता यावे अशी व्यवस्था करण्यात आली असून मंदिर आता २४ तास सुरु ठवण्यात येणार आहे. 

२६ जुलै पर्यंत चोवीस तास दर्शन 

विठ्ठलाचा शेज घरातील पलंग काढून विठ्ठलाच्या पाठीमागे मऊ मुलायम रेशमी लोड देण्यात आला. या काळात देवाला नवरात्र बसविण्यात आले. यानंतर विठ्ठलाचे सर्व राजोपचार बंद झाले असून २४ तास दर्शनाला सुरुवात करण्यात आली. २६ जुलैपर्यंत विठ्ठल भक्तांना २४ तास दर्शनासाठी उभा राहणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते देवाची विधीवत पूजा करण्यात आली. २६ जुलैच्या प्रक्षाळ पुजेपर्यंत विठ्ठलाचे २४ तास दर्शन खुले राहणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आमदार-खासदारांसोबत कसं वागावं? अधिकाऱ्यांसाठी 9 कलमी राजेशाही फर्मान

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

Maharashtra Politics: बड्या नेत्यांना हवं भाजपचं वाशिंग मशिन? मित्र पक्षांनाही भाजपची भुरळ

SCROLL FOR NEXT