Nandurbar Water Crisis : पाऊस पडल्यानंतरही नंदुरबारमध्ये पाणी टंचाई कायम

Nandurbar news : नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात पाऊस पडल्यानंतर पेरण्यांना वेग आला आहे. मात्र काही भागात अद्यापही पाऊस झालेला नाही.
Nandurbar News
Water ScarcitySaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत्या. मार्च महिन्यापासून नंदुरबार वासियांना पाण्याच्या समस्येने हेरले होते. पाऊस पाडल्यानंतर पाणी टंचाई कमी होईल अशी आशा होती. मात्र पाऊस पाडल्यानंतर देखील जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईची समस्या कायम आहे. जलजीवन योजना जिल्हाभरात राबवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या काही अंतरावर हि पाणी टंचाई जाणवत आहे. 

Nandurbar News
Jalgaon Accident : मुलाला शाळेत सोडून घरी परतताना काळाचा घाला; दुचाकीने मागून धडक दिल्याने पित्याचा मृत्यू

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात अनेक भागात पाऊस पडल्यानंतर पेरण्यांना वेग आला आहे. मात्र काही भागात अद्यापही पाऊस झालेला नाही. नंदुरबार शहरातील नवापूर चौफुले नजीक राहणाऱ्या आदिवासी महिलांना अद्यापही पाण्यासाठी वणवण करावं लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाऊस पडल्यानंतर देखील (Water Scarcity) पाणी टंचाईची समस्या नंदुरबारमध्ये कायम असून जलजीवन मिशन ही योजना जिल्हाभरात राबवणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या आदिवासी वस्तींमध्ये पाणी साठी महिलांचे हाल पाहिला मिळत आहेत.  

Nandurbar News
Dharashiv news : पिक कर्ज वसुलीसाठी हजारो शेतकऱ्यांची बँक खाती केली होल्ड; ऐन मशागतीच्या वेळी बँकांकडून शेतकऱ्यांची कोंडी

नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली नजीक राहणाऱ्या आदिवासी महिलांना पाणी मिळत नसल्याने कुपनलिकेतून या महिलांना पाणी भरावा लागत आहेत. वस्तीत असलेल्या नळाला पावसाळा सुरू होऊन देखील पाणी मिळत नसल्याने महिलांना पाणी टंचाईच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे. आता महिलांची पाण्यासाठीची हि भटकंती कधी थांबणार याकडे लक्ष आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com